Tuesday, 6 May 2025
  • Download App
    अयोध्या दौरा रद्द केल्यावर मनसे वर फुटला विरोधकांचा "टोमणे बॉम्ब"!!After the cancellation of Ayodhya tour, MNS exploded on the opposition

    राज ठाकरे : अयोध्या दौरा रद्द केल्यावर मनसे वर फुटला विरोधकांचा “टोमणे बॉम्ब”!!

    प्रतिनिधी

    मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज आपला आयोध्या दौरा स्थगित केला. त्यावरून सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली. तर मनसेवर सर्व विरोधी पक्षांचा “टोमणे बॉम्ब” फुटला!! After the cancellation of Ayodhya tour, MNS exploded on the opposition

    शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी खोचकपणे तीर्थयात्रेला आम्ही मदत केली असती ना… शिवसेनेचे मदत कक्ष अयोध्या, काशी, मथुरेसह सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये आहेत, असा टोला हाणला.

    राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपचे खासदार ब्रजभूषण सिंह यांनी देखील राज ठाकरेंवर टीका करायचे सोडले नाही. त्यांचा दौरा रद्द झाला असला तरी अयोध्येत कार्यकर्त्यांचे शरयू स्नान होणार आणि 5 जूनला मुख्यमंत्री उद्धव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस वैदिक पद्धतीने साजरा करणार, असे ब्रजभूषण सिंह यांनी जाहीर केले.



    तिसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेवर टीकास्त्र सोडताना सध्या अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवायचे ठरले आहे. आता नवीन भोंगा कोणता लावायचा, याचा विचार विनिमय सुरू आहे. लवकरच बोलू, असे खोचक ट्विट केले आहे.

    एकूण राज ठाकरे यांनी आपला आयोध्या दौरा थांबवला काय आणि मनसेवर लगेच “टोमणे बॉम्ब” फुटला काय!!, यातून जनतेची मात्र करमणूक झालेली दिसली.

    •  अयोध्या दौरा का रद्द केला? अडचण माहिती नाही. पण तीर्थयात्रेसाठी शिवसेनेचे मदत कक्ष आहेत. आम्ही नक्कीच त्यांना सहकार्य केलं असतं : संजय राऊत, शिवसेना प्रवक्ता
    •  रातोरात आमचे नगरसेवक चोरणारे, मनसैनिकांना अटक आणि तडीपार करणारे आम्हाला काय सहकार्य करणार? ते फक्त “कपिल शर्मा शो” करणार : संदीप देशपांडे, मनसे
    •  राज ठाकरे यांनी दौरा रद्द केला असला तरी 5 जूनला भाजप कार्यकर्त्यांचे शरयूत स्नान होणार. योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस वैदिक पद्धतीने दणक्यात साजरा करणार : ब्रजभूषण सिंह, खासदार, भाजप

    After the cancellation of Ayodhya tour, MNS exploded on the opposition

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    देशभरात मॉक ड्रिलचे आदेश, भारतात शेवटचा सायरन कधी वाजला होता?

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!