विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतावर गुलामी लादणाऱ्या ब्रिटनमध्ये ऋषी सुनक हे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान बनताच पाकिस्तान्यांना सुनक कुटुंबीयांचे पाकिस्तानातील मूळ गाव आठवले!! After Rishi Sunak became Prime Minister of Britain, Pakistanis remembered the native village of Sunak family
सुनक हे पंजाबी खत्री समाजाचे आहेत. ऋषी सुनक यांचे आजोबा रामदास सुनक हे सध्या पाकिस्तानात असलेल्या पण अखंड भारताचा भाग असलेल्या गुजरावाला गावचे. त्यांनी 1935 मध्ये गुजरावाला सोडले. त्यानंतर त्यांच्या पत्नी राणी सुनक यांनी 1937 मध्ये गुजरावाला सोडले.
रामदास सुनक हे केनियाची राजधानी नैरोबी येथे नोकरी निमित्ताने गेले. त्यानंतर त्यांचे पुत्र नैरोबीतून ब्रिटनला शिफ्ट झाले. 1980 मध्ये ऋषी सुनक यांचा जन्म ब्रिटनमध्ये झाला. त्यामुळे त्यांचा वंश जरी भारतीय असला तरी जन्माने ते ब्रिटिश नागरिक आहेत.
ऋषी सुनक हे ब्रिटनचे अर्थमंत्री होते. त्याआधी देखील सार्वजनिक राजकीय जीवनात विविध पदांवर होते. तेव्हा पाकिस्तान्यांना सुनक कुटुंबीयांचे मूळ गाव आठवले नाही, पण ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान बनल्याबरोबर मात्र सुनक कुटुंबीय हे मुळात पाकिस्तानातल्या गुजरावाला गावाचे होते, अशी माहिती पाकिस्तानातल्या सोशल मीडियात फिरत आहे. पाकिस्तानी सरकारने अधिकृतरित्या या मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
After Rishi Sunak became Prime Minister of Britain, Pakistanis remembered the native village of Sunak family
महत्वाच्या बातम्या
- गोव्यात नरकासुर दहन; अयोध्येत रामलल्लांचे दर्शन; उज्जैन मध्ये महाकाल पूजन
- कर्नाटकातही हलाल विरोधात आंदोलन जोरावर; हिंदू उतरले रस्त्यावर!!
- नोकरीची संधी : महावितरण विभागात परीक्षेविना केली जाणार निवड, असा करा अर्ज
- CAIT estimate : दिवाळीचा हर्ष, होऊ दे खर्च; भारतीय करताहेत तब्बल 2,50,000 कोटी रुपयांचा आनंद