विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी ऐकण्यासाठी परस्पर विरोधी असणाऱ्या राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन राजकीय शिष्टाई केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सायंकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेणार आहेत म्हणजे तशा बातम्या आल्या आहेत. After Nitish Kumar diplomacy sharad Pawar to meet mallikarjun kharge, what will happen to opposition unity??
महाराष्ट्रात महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिल्ली पडल्यानंतर तिची डागडुजी करायला पवारांनी प्रयत्न चालू केले. त्यासाठी उद्धव ठाकरे यांना ते सिल्वर ओकवर भेटले. पण काँग्रेसचे बाकीचे कुठलेही नेते त्यांच्या भेटीला सिल्वर ओकवर पोहोचले नव्हते. उलट ठाकरे – पवार भेटीच्या दरम्यानच विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि शरद पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काही गोष्टी सुनावल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने नानांनी परस्पर महाविकास आघाडी बद्दल प्रसार माध्यमांची बोलण्याच्या आधी महाविकास आघाडीत समन्वय साधावा, असे ते दोन्ही नेते म्हणाले होते.
या पार्श्वभूमीवर मूळातच महाविकास आघाडीत काही विशिष्ट मुद्द्यांवर विसंवाद आहे. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. गौतम अदानी मुद्द्यावर ते सातत्याने मोदी सरकारला घेरत आहेत. पंतप्रधान मोदींच्या पदवी विषयी शंका व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन वर विरोधकांचा आक्षेप आहे. या चार मुद्द्यांवर महाविकास आघाडीत मोठे मतभेद असल्याचे दिसले आहे.
या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी कालच राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची सकाळी भेट घेतली, तर सायंकाळी ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले होते. काँग्रेस आणि केजरीवाल यांचे दिल्लीतले नाते साप – मुंगसाचे आहे. तरी देखील नितेश कुमार यांनी दोन्ही पक्षांमध्ये समन्वय राखण्याच्या दृष्टीने भेटीगाठी केल्या. आता त्यांना यश किती येईल??, हा भविष्यातला भाग आहे.
पण दरम्यानच्या काळात आज शरद पवार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत आहेत. या भेटीतून विरोधी ऐक्याच्या दृष्टीने कोणत्या दिशेने पाऊल पडते की विरोधी ऐक्याची वज्रमूठ महाराष्ट्रासारखीच राष्ट्रीय पातळीवर देखील ढिल्ली पडते??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पवारांनी काँग्रेसला बॅकफूटवर ढकलले
शरद पवार मल्लिकार्जुन खर्गे यांची आज भेट घेत असल्याच्या आधी खर्गे यांच्याच घरी 18 पक्षांची बैठक झाली होती. त्या बैठकीच्या आधी सावरकर मुद्दा प्रचंड तापला होता. त्यावेळी शरद पवारांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सामाजिक आणि क्रांतिकारक योगदानाविषयी बैठकीत माहिती देऊन काँग्रेसला बॅकफूटवर ढकलले होते. त्यानंतर एनडीटीव्ही आणि एबीपी माझा या वृत्तवाहिन्यांना मुलाखती देऊन त्यांनी अदानी मुद्द्यावर काँग्रेसला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला. पण सावरकर मुद्द्यावर त्यांना जे यश आले होते, तेवढे यश पवारांना अदानी मुद्द्यावर आले नाही. कारण राहुल गांधींनी अदानी मुद्दा अजूनही सोडलेला नाही. तुला त्यानंतर ते अधिक आक्रमक झाले.
अदानी मुद्द्यावर काय चर्चा होणार?
या पार्श्वभूमीवर आजच्या पवार – खर्गे भेटीत नेमके काय घडणार??, अदानी मुद्द्यावर या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा होणार??, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच मतभेदाचे मुद्दे बाजूला सारून विरोधकांचे ऐक्य कसे साधता येईल??, यावर हे दोन्ही नेते चर्चा करून विरोधी ऐक्याची वज्रमूठ राष्ट्रीय पातळीवर आवळणार की त्या बैठकीनंतर ती वज्रमूठ ढिल्ली पडणार??, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
After Nitish Kumar diplomacy sharad Pawar to meet mallikarjun kharge, what will happen to opposition unity??
महत्वाच्या बातम्या
- काश्मिरात एक लाखाहून जास्त काश्मिरी पंडित होणार मतदार, भाजपने म्हटले- काश्मिरी पंडितांना लोकशाही अधिकार देण्याच्या दिशेने मोठे पाऊल
- कर्नाटकात भाजपची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, त्यात 2 महिलांचा समावेश; 7 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली
- स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वंशजांनी राहुल गांधींविरोधात दाखल केला मानहानीचा खटला
- ‘’मग Penguin आणि UTने सालियानच्या केसच्या भितीने…’’; नितेश राणेंनी साधला निशाणा!