• Download App
    मायावतींनी तिकीट नाकारल्यानंतर अक्षरशः धाय मोकलून रडला बसप कार्यकर्ता!! |After Mayawati refused the ticket, the BSP worker literally let go and cried !!

    मायावतींनी तिकीट नाकारल्यानंतर अक्षरशः धाय मोकलून रडला बसप कार्यकर्ता!!

    वृत्तसंस्था

    लखनऊ : निवडणुकीची तिकिटे मिळवण्यासाठी नेते आणि कार्यकर्ते काय काय “चमत्कार” करतात आणि हातखंडे स्वीकारतात, हे अनेकदा आपल्याला पाहायला मिळते. परंतु एका कार्यकर्त्याला आयत्या वेळेला तिकीट नाकारल्यानंतर तो कार्यकर्ता धाय मोकलून रडल्याचे उदाहरण दुर्मिळच म्हणावे लागेल.After Mayawati refused the ticket, the BSP worker literally let go and cried !!

    उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी पक्षाचे कार्यकर्ते अर्शद राणा यांना तिकीट देण्याचे वचन दिले होते. त्यांनी आपल्या परिसरात प्रचंड खर्च करून मोठमोठी होर्डिंग लावली होती. प्रचाराला सुरुवातही केली होती.



    परंतु आयत्या वेळेला मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने अर्षद राणा यांचे तिकीट कापले. तिकीट कापल्यानंतर अर्षद राणा यांचा संताप अनावर झाला. परंतु त्यांनी शिवीगाळ केली नाही, तर त्यांना अक्षरशः धाय मोकलून रडू कोसळले.

    अर्षद राणा यांच्या रडण्याचा व्हिडीओ उत्तर प्रदेशात जोरदार व्हायरल झाला आहे. त्यांचे कार्यकर्ते त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु ते रडतच मला तिकीटाचे वचन दिले होते.

    मी खर्च करून होर्डिंग लावली पण आयत्यावेळी माझे तिकीट कापले, असे पत्रकारांना सांगत आहेत असे या व्हिडिओ दिसत आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मायावती नेमका कोणता निर्णय घेतात याकडे उत्तर प्रदेशाचे लक्ष लागले आहे.

    After Mayawati refused the ticket, the BSP worker literally let go and cried !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप