• Download App
    मध्य प्रदेश, राजस्थान आणि पंजाबनंतर आता छत्तीसगड कॉंग्रेसमध्ये बेबनाव सुरू, भूपेश बघेल अडीच वर्षांचेच मुख्यमंत्री? । after madhya pradesh rajasthan and punjab now there is a tussle in chhattisgarh congress

    मध्य प्रदेश, राजस्थान आणि पंजाबनंतर आता छत्तीसगड कॉंग्रेसमध्ये बेबनाव सुरू, भूपेश बघेल अडीच वर्षांचेच मुख्यमंत्री?

    Tussle In Chhattisgarh Congress : छत्तीसगड असे एक राज्य आहे जेथे 90 जागांपैकी 70 जागांवर कॉंग्रेसचा कब्जा आहे. संपूर्ण देशात जर कॉंग्रेस सर्वात बळकट कुठे असेल, तर ती छत्तीसगडमध्येच आहे. आतापर्यंत छत्तीसगडमधून मध्यप्रदेश, राजस्थान आणि पंजाबसारख्या पक्षांतर्गत मतभेदाच्या बातम्या येत नव्हत्या. परंतु आता छत्तीसगडमध्येही पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. after madhya pradesh rajasthan and punjab now there is a tussle in chhattisgarh congress


    विशेष प्रतिनिधी

    रायपूर : छत्तीसगड असे एक राज्य आहे जेथे 90 जागांपैकी 70 जागांवर कॉंग्रेसचा कब्जा आहे. संपूर्ण देशात जर कॉंग्रेस सर्वात बळकट कुठे असेल, तर ती छत्तीसगडमध्येच आहे. आतापर्यंत छत्तीसगडमधून मध्यप्रदेश, राजस्थान आणि पंजाबसारख्या पक्षांतर्गत मतभेदाच्या बातम्या येत नव्हत्या. परंतु आता छत्तीसगडमध्येही पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.

    कॉंग्रेसचे आमदार बृहस्पति सिंह यांनी आरोग्यमंत्री टी.एस. सिंहदेव यांच्यावर आपल्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर राजकीय वातावरणाचा पारा चांगलाच तापला आहे. आमदार बृहस्पती सिंहांचा आरोप आहे की, जेव्हापासून त्यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे कौतुक केले आहे आणि अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा फेटाळली आहे, तेव्हापासून ते आरोग्यमंत्री टी.एस. सिंहदेव यांच्या निशाण्यावर आहेत.

    नेमकं काय घडलं?

    आ. बृहस्पती सिंह यांनी शनिवारी रात्री आपल्या कारवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला. आरोग्यमंत्री टी.एस. सिंहदेव यांनी हा हल्ला घडवल्याचे ते म्हणाले. सिंहदेव यांच्या सूचनेवरून हे घडले आणि हल्लेखोर हे त्यांचे नातेवाईक असल्याचा दावाही त्यांनी. त्यानंतर आमदार बृहस्पति सिंह यांनी अंबिकापूर येथील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. पोलिसांनी आरोपींना पकडून ताब्यात घेतले आहे.

    18 आमदारांनी केले शक्तिप्रदर्शन

    अंबिकापुरमध्ये एफआयआर नोंदवून आरोपींना अटक झाल्यानंतर प्रकरण शांत होण्यास सुरुवात झाली. पण बृहस्पति सिंह रायपूरला पोहोचताच इथूनच संपूर्ण कथा बदलली. त्यानंतर थोड्याच वेळात 18 आमदार बृहस्पती सिंह यांच्या बंगल्यात जमले. जमलेल्या आमदारांपैकी अंबिकापूर विभाग म्हणजेच आरोग्यमंत्री टी.एस. सिंहदेवांच्या प्रभावाखाली असलेल्या भागातील आमदारही होते. आमदारांसोबत दोन तासांच्या चर्चेनंतर बृहस्पति सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली.

    या पत्रकार परिषदेत आमदार बृहस्पती सिंह यांनी धक्कादायक वक्तव्ये केली. त्यांनी आरोप केला की, आरोग्यमंत्री टी.एस. सिंघदेव त्यांना आणि 4-5 आमदारांना खुर्ची मिळवण्यासाठी ठार करू शकतात. हे पूर्वीचे राजे-महाराजे आहेत. पूर्वीच्या काळात आमच्या पूर्वजांना बांधून मारहाण केली जात होती. परंतु आज आपण हे सर्व करू शकणार नाहीत. आम्ही जागरूक झालो आहोत. असे षडयंत्र करणार्‍या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे. जेव्हा आ. बृहस्पती हे सर्व सांगत होते, तेव्हा त्यांच्यासमवेत 18 आमदारांचा पाठिंबा होता. येथून हे प्रकरणाने आरोग्यमंत्र्यांविरुद्ध 18 आमदारांनी बंड पुकारल्यासारखे झाले होते. येथे सर्व आमदारांचे फोटोसेशन झाले आणि सर्व विधिमंडळ गटाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री सदनाकडे रवाना झाले.

    आरोग्यमंत्री आणि आरोप करणाऱ्या आमदाराची सीएम हाऊसमध्ये भेट

    मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. राज्याचे प्रभारी पीएल पुनिया हेदेखील उपस्थित होते. मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि आरोग्यमंत्री टी.एस. यांच्यासोबत पी.एल. पुनिया बसलेले होता. काही काळानंतर बृहस्पति सिंह आणि आरोग्यमंत्री टी.एस. सिंहदेव यांचे फोटो समोर आले. आरोग्यमंत्री बाहेर आले आणि म्हणाले की, आमदार भावनावेगात असे बोलून गेले आहेत. पार्टी फोरमची चर्चा असल्याने मी यावर जास्त बोलणार नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्र्यांच्या सूत्रावर आरोग्यमंत्री टी.एस. सिंहदेव यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

    आता पुढे काय?

    छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाल्यापासून अडीच वर्षे मुख्यमंत्री राहण्याच्या सूत्रावर चर्चा होत आहे. 17 जून 2021 रोजी भूपेश बघेल यांची अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर राज्यात नेतृत्व बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यावर काँग्रेस हायकमांडने कधीही उघडपणे मत व्यक्त केले नाही. कॉंग्रेसचे प्रदेश प्रभारी पीएल पुनिया यांनी अडीच वर्षांचे कोणतेही सूत्र नसल्याचे निश्चितपणे अनेक वेळा सांगितले आहे. अशा परिस्थितीत असे अनेक प्रश्न आहेत जे राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये घडलेल्या घटनांकडे इशारा करतात. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत छत्तीसगडमध्ये बंडखोरीचा बिगुल वाजला असून बंडखोरांना आता हे कसे हाताळले जाईल, यावर चर्चा सुरू आहे.

    after madhya pradesh rajasthan and punjab now there is a tussle in chhattisgarh congress

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!