प्रतिनिधी
नवी दिल्ली : गुलाम नबी आझाद यांच्या पाठोपाठ आनंद शर्मा यांनी काँग्रेसला धक्का दिला आहे. आनंद शर्मा यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे आश्वासन शर्मा यांनी दिले आहे. After Ghulam Nabi, Anand Sharma is also a shock to Congress
आनंद शर्मा यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला आहे. शर्मा हे जी 23 गटाचे सदस्य आहेत. त्यांच्या आधी गुलाम नबी आझाद यांनीही जम्मू काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या अध्यक्षपदावरून नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता. मागच्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. आत्तापर्यंत कॉंग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांनी राजीनामा दिला आहे.
जम्मू-काश्मीरमधील प्रचार समिती अध्यक्षपदाचा राजीनामा
गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीरमधील प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता आनंद शर्मा यांनी राजीनामा दिला आहे. सल्लामसलतीत दुर्लक्ष करण्यात आल्याचे आनंद शर्मा यांनी काँग्रेस अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र, ते राज्यातील पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करत राहणार आहेत. आनंद शर्मा यांची एप्रिल 2022 मध्ये सुकाणू समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
After Ghulam Nabi, Anand Sharma is also a shock to Congress
महत्वाच्या बातम्या
- Al Shabaab Attack : दहशतवादी हल्ल्यानंतर सोमालियाच्या हॉटेलमध्ये परिस्थिती नियंत्रणात, 30 तासांत अल शबाबमध्ये 40 जणांचा मृत्यू
- उद्धव ठाकरेंची कडाडून टीका : म्हणाले- ‘मोदी युगा’चा अस्त, बाळासाहेबांच्या नावाने मते मागत आहेत फडणवीस!
- Mumbai Terror Threat : मुंबईत 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्याची धमकी, फडणवीस म्हणाले – याबाबत गंभीर, संपूर्ण चौकशी होईल