विशेष प्रतिनिधी
कन्याकुमारी : भारत मातेमुळे आपले पाय गलिच्छ होऊ नयेत आणि कोणत्याही आजाराची लागण होऊ नये म्हणून आम्ही चप्पल घालतो. असे म्हणत हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह विधान कन्याकुमारीतील ख्रिश्चन धर्मगुरूने केले होते.After 30 complaints were lodged, a Christian leader from Kanyakumari came to the spot and apologized for making offensive remarks about Hinduism.
मात्र, तामीळनाडूतील विविध जिल्ह्यांत त्याच्यविरुध्द ३० पोलीस तक्रारी झाल्यावर जागेवर आला आणि आपल्या वक्त्यव्याबाबत माफी मागितली. भविष्यातही हिंदू धर्माविषयी वाईट बोलणार नाही असे त्याने म्हटले आहे.
कन्नियकुमारी येथील जन यागा ख्रिस्तुवा पेरावई अमाईपुचा सल्लागार जॉर्ज पोन्या असे या धर्मगुरूचे नाव आहे. हिंदू धर्मावर तसेचपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांच्यावरही पोन्नयांनी टीका केली हाती. यानंतर हिंदू संघटनांनी त्यांच्या भाषणाचा निषेध करत अटक करण्याची मागणी केली. कन्नियकुमारी आणि तामिळनाडूच्या इतर जिल्ह्यांत जवळपास 30 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
माओवादी विचारसरणीचा आरोप असलेले कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आल होते. त्यावेळी पोन्या यांनी हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह विधान केले हाते.
मात्र, पोलीसांत तक्रार आणि सर्वत्र संताप झाल्यावर पोन्या म्हणाले, माझ्या भाषणाचा व्हिडीओ संपादित करण्यात आला आहे. हा संपादित व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांचा असा गैरसमज झाला आहे की मी हिंदू धर्म आणि श्रद्धा विरोधात बोललो आहे.
माझ्या भाषणामुळे माज्या हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. मी माझ्याहिंदू बांधवांना हे सांगू इच्छितो की भविष्यातही मी कधीही अशा प्रकारच्या टीका करणार नाही,
तामिळनाडू अल्पसंख्यांक कल्याण मंत्रालय आणि अल्पसंख्यांक आयोग अल्पसंख्याकांना प्रार्थना सभा घेण्यापासून नकार देत आहे, असा आरोप करत द्रवीड मुनेत्र कळघम पक्षाला मते मिळविण्यासाठी अनेक अल्पसंख्यक संघटनांसह आपण कठोर परिश्रम घेतले होते
असा गौप्यस्फोटही पोन्या यांनी केला आहे. ते म्हणाले, आम्ही अशा ठिकाणी प्रचार केला जेथे राजकारणी प्रवेश करू शकत नाहीत. आम्ही सर्वांना द्रमुकला मतदान करण्याचे आवाहन केले. द्रमुक सत्तेत आला तरच आमचे दु: ख दूर होईल, असे सांगितले. परंतु, या सरकारने आमची फसवणूक केलेली आहे.
After 30 complaints were lodged, a Christian leader from Kanyakumari came to the spot and apologized for making offensive remarks about Hinduism.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचे सातत्याने लक्ष, NDRFची 26 पथके, 4 हेलिकॉप्टर्स, लष्करही दाखल; देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृह राज्यमंत्री, मुख्यमंत्र्यांशी चर्चा
- Raj Kundra Pornography Case : राज कुंद्राच्या पॉर्न साम्राज्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन? १२१ व्हिडिओंसाठी १२ लाख डॉलर्सचा रेट, मुंबई पोलिसांची माहिती
- Maharashtra Landslide : राज्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- Maharashtra Landslide Updates : राज्यात 10 ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू, अजित पवारांचा राजनाथ सिंहांना फोन, लष्कराची मागितली मदत