• Download App
    Afghanistan Rescue Operation: अफगानिस्तान मध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी 'देवदूत' Indian Air Force। Afghanistan Rescue Operation: 'Angel' Indian Air Force for Indians stranded in Afghanistan

    Afghanistan Rescue Operation: अफगानिस्तान मध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ‘देवदूत’ Indian Air Force

    अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप परत आणण्यासाठी आता भारतीय हवाई दल पुढे सरसावलं आहे.


    विशेष प्रतिनिधी

    काबूल: अफगाणिस्तान (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) ताब्यात गेल्यापासून तेथील परिस्थिती ही सतत बिघडत चालली आहे. येथील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन भारत सरकारने (Indian Government) तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना (Indian Citizens in Afghanistan) मायदेशी आणण्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांनी, एएनआय या वृत्तसंस्थेला अशी माहिती दिली आहे की, भारतीय हवाई दलाच्या C-17 ग्लोबमास्टर विमानाने 120 हून अधिक भारतीय अधिकाऱ्यांना घेऊन काबूलहून उड्डाण केले आहे. या लोकांना रात्री उशिरा विमानतळाच्या सुरक्षित भागात आणून नंतर इथून बाहेर काढण्यात आले आहे. Afghanistan Rescue Operation: ‘Angel’ Indian Air Force for Indians stranded in Afghanistan


    धर्मो रक्षति रक्षितः! काबूलमधले ‘शेवटचे हिंदू पुजारी’ जीव धोक्यात घालून तिथेच थांबलेत ; कारण…


    त्याचवेळी, सूत्रांनी सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये अनेक भारतीय आहेत, ज्यांना आता पुन्हा भारतात परतण्याची इच्छा आहे. सध्या ते हिंसाचार झालेल्या भागातून दूर सुरक्षित ठिकाणी पोहचले आहेत. एक-दोन दिवसात सरकार त्यांना सुरक्षितपणे भारतात आणणार आहे. यासाठी एक विशेष विमान पाठवलं गेलं आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांची संख्या सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव जाहीर केलेली नाही.

    रविवारी रात्री देखील एक विमान काबूलला पोहोचलं होतं आणि तिथून काही भारतीयांना घेऊन सोमवारी सकाळी भारतात परतलं आहे. त्याच वेळी, आता दुसरं विमानही 120 जणांना घेऊन परतत आहे. लवकरच हे विमान देखील भारतात येणार आहे. सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, ही विमानं काबूलमध्ये अनेक फेऱ्या मारणार असून ते तिथे अडकलेल्या भारतीयांना माघारी घेऊन येण्याचं काम करणार आहे.

    भारतीयांच्या मदतीसाठी ‘अफगाणिस्तान सेल’

    याआधी सोमवारी भारत सरकारने अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीमध्ये आपल्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करेल असे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, ‘परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी इतर बाबींसाठी एक विशेष ‘अफगाणिस्तान सेल’ स्थापन केला आहे. येथे असलेल्या भारतातील लोकांशी संपर्क वाढवण्यासाठी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देखील जारी करण्यात आला आहे.’

    दरम्यान, यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, ‘अफगाणिस्तानमधील बिघडत चाललेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. भारतात परतणाऱ्या लोकांबद्दल आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.’

    Afghanistan Rescue Operation: ‘Angel’ Indian Air Force for Indians stranded in Afghanistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती