• Download App
    कौतुकास्पद ! अमेरिकेकडून ग्लोबल टीचर डिसले गुरुजींना मिळणार फुलब्राईट’ शिष्यवृत्ती|Admirable! Global Teacher Disley Guruji to receive Fulbright Scholarship from USA

    कौतुकास्पद ! अमेरिकेकडून ग्लोबल टीचर डिसले गुरुजींना मिळणार फुलब्राईट’ शिष्यवृत्ती

    जगभरातील ४० शिक्षकांना मानाची समजली जाणारी ‘फुलब्राईट’ शिष्यवृत्ती अमेरिकेन सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.Admirable! Global Teacher Disley Guruji to receive Fulbright Scholarship from USA


    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे.

    जगभरातील ४० शिक्षकांना मानाची समजली जाणारी ‘फुलब्राईट’ शिष्यवृत्ती अमेरिकेन सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. दरवर्षी ही शिष्यवृत्ती अमेरिकन सरकारडून दिली जात असून यंदाचे हे ७५ वे वर्ष आहे.



    पीस इन एज्युकेशन या विषयामध्ये अमेरिकेत संशोधन करण्यासाठी रणजितसिंह डिसले यांना ही शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. फुलब्राईट शिष्यवृत्तीच्या माध्यमातून जगभरातील प्रतिभावंत शिक्षकांना एकत्रित आणून शैक्षणिक संशोधन करण्याची संधी दिली जाते.

    नाविन्यपुर्ण उपक्रम करत डिसले गुरूजी जगभरातील ५० इनोव्हेटीव्ह शिक्षकांच्या यादीत विराजमान झाले. मायक्रोसॉफ्ट, गुगल, ब्रिटीश कौन्सिल, प्लीपग्रीड, प्लिकेर्स यांसारख्या आंतराष्ट्रीय संस्थांमध्ये कार्यरत आहेत. आता जगातील सर्वोत्तम विद्यापीठात संशोधन करण्याची संधी डिसले गुरूजींना मिळणार आहे.

    Admirable! Global Teacher Disley Guruji to receive Fulbright Scholarship from USA

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!