वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशाने ऑगस्टमध्ये लसीकरणाचा नवा विक्रम केला आहे. एका महिन्यात तब्बल १८ कोटी ३८ लाख डोस नागरिकांना दिले आहेत. एकंदरीत दिवसाला सरासरी ५९.२९ लाख डोस असे प्रमाण आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तर दिवसाला ८० लाखाहुन लोकांचे लसीकरणं केले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली. administered 18.38 crores of doses in the month of August 2021 alone. The average dose per day administered in August is 59.29 lakh.
विशेष म्हणजे गेल्या पाच दिवसात दुसऱ्यांदा म्हणजेच बुधवारी एकाच दिवशी कोरोना लसीचे एक कोटी डोस देण्याचा विक्रम भारतात करण्यात आला आहे. मंगळवारी एकाच दिवसात तब्बल १.३०कोटी लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे.
याचसोबत भारतात आता कोरोना लसीचे ६५ कोटीहून जास्त डोस देण्यात आले असून देशातील ५० टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे. हिमाचल प्रदेशने राज्यातील १०० टक्के लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला असून असं करणारे ते देशातील पहिलेच राज्य आहे.
एका आठवड्यात देशात एकूण ४.६६ कोटी लसी
ऑगस्ट महिन्यात एकूण १८.६ कोटी डोस देण्यात आले आहेत. एकाच महिन्यात कोरोनाच्या इतक्या मोठ्या प्रमाणात डोस देणारा भारत हा एकमेव देश आहे. तर २१ते २७ ऑगस्ट या दरम्यान, एकाच आठवड्यात देशात एकूण ४.६६ कोटी लसी देण्यात आल्या, हाही एक विक्रमच आहे.