• Download App
    23 ते 30 मे या कालावधीसाठी सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना रेमडेसिव्हिरच्या अतिरिक्त कुप्यांचे वितरण । Additional vials of Remdesivir allocated to all states/UTs for the period 23rd to 30th May

    23 ते 30 मे या कालावधीसाठी सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना रेमडेसिव्हिरच्या अतिरिक्त कुप्यांचे वितरण

    Remdesivir : केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी माहिती दिली की, 23 ते 30 मे या कालावधीसाठी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना रेमडेसिवीरच्या अतिरिक्त 22.17 लाख कुप्यांचे वाटप करण्यात आले आहे. Additional vials of Remdesivir allocated to all states/UTs for the period 23rd to 30th May


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी माहिती दिली की, 23 ते 30 मे या कालावधीसाठी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना रेमडेसिवीरच्या अतिरिक्त 22.17 लाख कुप्यांचे वाटप करण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, यापूर्वी 23 मे पर्यंत सर्व राज्यांना या औषधाच्या 76.70 लाख कुप्यांचे वितरण करण्यात आले असून, आतापर्यंत देशभरात 98.87 लाख कुप्यांचे वाटप करण्यात आले आहे.

     

    केंद्रीय रसायन व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी रविवारी सांगितले की, कोरोना संसर्गाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमाडेसीव्हिर औषधाच्या आणखी 22.17 लाख कुप्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली आहेत. सरकारने आतापर्यंत या इंजेक्शनच्या 98.87 लाख कुप्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना वाटप केल्या आहेत.

    गौडा यांनी ट्वीट केले की, ‘सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 23 मे ते 30 मेपर्यंत रेमेडीसवीरच्या अतिरिक्त २२.17 लाख कुप्या वाटप केल्या गेल्या. यापूर्वी या औषधाच्या. 76.70 लाख कुप्या उपलब्ध केल्या. 23 मेपर्यंत सर्व राज्यांना उपलब्ध केल्या आहेत. आतापर्यंत देशभरात रेमडिसिवीरच्या एकूण 98.87 लाख कुप्या वाटल्या गेल्या आहेत.

    दुसरीकडे, कर्नाटकने दुरुपयोग रोखण्यासाठी एसएमएसद्वारे सूचना देण्याची प्रणाली सुरू केली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री म्हणाले की, या प्रणालीमुळे रुग्णाला एसएमएसच्या माध्यमातून सूचना दिली जाते की, एसआरएफ आयडीवर कोणत्याही रुग्णालयात हे औषध उपलब्ध असेल. जर एसआरएफ आयडीवर औषध नोंद होऊनही जर रुग्णालयाने ते नाकारले तर याची तक्रार थेट सरकारला करता येणार आहे.

    Additional vials of Remdesivir allocated to all states/UTs for the period 23rd to 30th May

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!