• Download App
    अदानी ग्रुप विकत घेणार एनडीटीव्ही मीडिया ग्रुपचे 29.18 % शेअर्स; आणखी 26 % शेअर्स विकत घेण्याचीही तयारीAdani Group to acquire 29.18% stake in NDTV Media Group

    अदानी ग्रुप विकत घेणार एनडीटीव्ही मीडिया ग्रुपचे 29.18 % शेअर्स; आणखी 26 % शेअर्स विकत घेण्याचीही तयारी

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : देशातील आघाडीचा अदानी ग्रुप एनडीटीव्ही मीडिया ग्रुपचे 29.18 % शेअर्स विकत घेणार आहे. त्याचबरोबर आणखी 26 % शेअर्स खरेदी करण्याची खुली ऑफरही दिली आहे. अदानी ग्रुपने आपल्या अधिकृत निवेदनात ही माहिती दिली आहे. 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वीची ही मीडिया मॅनेजमेंट असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. Adani Group to acquire 29.18% stake in NDTV Media Group

    एनडीटीव्हीचे शेअर्स घेण्याबाबत अदानी ग्रुपने निवेदन प्रसिद्ध केले आहे. अदानी ग्रुपची उपकंपनी असलेली एनडीटीव्ही मीडिया नेटवर्क्स लिमिटेड न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडमधील 29.18 % हिस्सा विकत घेणार आहे. तसेच उर्वरित 26 % हिस्सा विकत घेण्याची ऑफरही अदानी ग्रुपने एनडीटीव्हीला दिली आहे. यासाठी 493 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे.

    ज्याच्या एका शेअरची किंमत 294 रुपये असेल. या व्यवहारामुळे एनडीटीव्हीच्या शेअर्सने शेअर बाजारात 5 %उसळी मारलेली पहायला मिळाली. ज्यामुळे त्याची किंमत 376.55 रुपयांवर पोहोचली.

    एनडीटीवी वर प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांचे वर्चस्व आहे. संपादकीय धोरणानुसार एनडीटीव्ही मोदी सरकारचा विरोधक मानला जातो या पार्श्वभूमीवर अदानी ग्रुप कडे एनडीटीव्हीचा मोठा वाटा जाणे याला राजकीय दृष्ट्या देखील वेगळे महत्त्व आहे.

    Adani Group to acquire 29.18% stake in NDTV Media Group

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही