• Download App
    अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सेबीने ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड, नियमांचे केले उल्लंघन|Actress Shilpa Shetty fined Rs 3 lakh by SEBI for violating rules

    अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सेबीने ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड, नियमांचे केले उल्लंघन

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : प्रसिध्द अभिनेत्री आणि पॉर्न व्हिडीओ प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्रा याची पत्नी शिल्पा शेट्टी हिला सेबीने तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ट्रेडिंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.Actress Shilpa Shetty fined Rs 3 lakh by SEBI for violating rules

    राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी, रिपु कुंद्रा आणि त्यांची कंपनी वियान इंडस्ट्रीजवर सेबीच्या नियमांच उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शिल्पा शेट्टी हिचे पती राज कुंद्रा अश्लिल चित्रपट निर्मिती प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे.



    पोलिसांकडून राज कुंद्रा यांची चौकशी सुरु आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या वियानं इंडस्ट्रीजनं सेबीच्या इनसायडर ट्रेडिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळं हा दंड लावण्यात आला आहे.

    पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या उद्योगपती राज कुंद्रा यांचे बँक खाते आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक केली आहे. कंपनीशी संबंधित राज कुंद्रा , शिल्पा शेट्टी, अरविंद श्रीवास्तव, हर्षिता श्रीवास्तव आणि इतरांच्या बँक खात्यांची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटर्सना बोलवण्यात आले आहे.

    पोलिसांनी या प्रकरणात राज कुंद्राची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नाही.कुंद्रा यांचे बँक खाते आणि विवान इंडस्ट्रीजचे संयुक्त खाते, ज्यात शिल्पा शेट्टी भागीदार होत्या, याचीही चौकशी सुरु आहे. ही कंपनी कथित पॉर्न फिल्म प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे. कुंद्राकडे अशी अनेक बँक खाती आहेत ज्यात परदेशातून पैसे जमा होते.

    २० जुलैला राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणी राज कुंद्र आणि शिल्पा शेट्टीच्या बँका खात्यांची देखील मुंबई गुन्हे शाखेने चौकशी केली. राज कुंद्राच्या बँक खात्यांमधून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार होत असल्याचं उघड झाले आहे. राज कुंद्राची कानपूरमधील दोन बँक खाती सील करण्यात आली आहेत.

    Actress Shilpa Shetty fined Rs 3 lakh by SEBI for violating rules

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही