विशेष प्रतिनिधी
दिल्ली : सुकेश चंद्रशेखर हे नाव आताशा जवळपास सर्वांना माहीत झाले असेल. 200 रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही दोघींची ईडीने चौकशी केली होती. या चौकशीनंतर जॅकलिनने आणि नोराने आपल्यावरील आरोप सर्व फेटाळून लावत सुकेशने केलेल्या खोट्या प्राॅमिसेसची माहिती ईडीला दिली होती.
Actress Nora Fateh will be goverment witness against Sukesh Chandrasekhar
जॅकलिनला 500 करोड बजेटची वुमेन सेंट्रिक फिल्म बनविण्याचे लालच देत सुकेशने तिला करोडो रुपयांचे गिफ्ट्स दिले होते. असे समोर आले होते.
तर आता सुकेशची पत्नी लीना पॉलने चेन्नईमध्ये एका घेतलेल्या कार्यक्रमामध्ये नोरा फतेही मुख्य गेस्ट म्हणून गेली होती. त्यावेळी तिला एक बीएमडब्ल्यू कार आणि एक आयफोन गिफ्ट म्हणून देण्यात आला होता. मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट 2002 सेक्शन नुसार नोरा फतेहीचे हे स्टेटमेंट पुरावा म्हणून रेकॉर्ड करण्यात आले आहे. आणि आता नोरा फतेही सरकारी साक्षीदार बनवून कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरलाविरुद्ध साक्ष देणार आहे.
जेल मध्ये बंद असलेले पूर्व रॅनबॅक्सीचे फाउंडरना जेलमधून बाहेर काढण्यासाठी त्याच्या परिवाराला 200 करोड रूपयांना त्याने जेल मध्ये असूनही लुटले. ह्या घटनेनंतर सुकेशच्या बाकी कारामतींचा पाढा समोर आला आहे.
तर सुकेशने जेलमध्ये असूनही जे सर्व कसे केले? तर सुकेशने आपला जेलमधील सीसीटीव्ही कॅमेरा खराब केला होता. जेलमधील कर्मचारी, शिपाई, पोलिस सर्वांना लाखो रूपये देऊन त्यांना आपल्या बाजूने करून घेतले होते. आणि त्याचमुळे तो जेलमधून सर्व फिल्मस्टार्सना फोन करून आपण खूप मोठा माणूस आहे असे सांगून त्यांच्यावर पैसे उधळण्याचे काम करत होता.
यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी श्रद्धा कपूर अभिनेता हरमन बावेजा यांचे त्याने नावे घेतलेले होते.
Actress Nora Fateh will be goverment witness against Sukesh Chandrasekhar
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेत विदाऊट ड्रायव्हरची गाडी, राज्यामध्ये लोकशाही विदाऊट मुख्यमंत्री; सुधीर मुनगंटीवार
- बेकायदेशीर सावकारीबाबत थेट पुणे पोलिसांना देऊ शकता माहिती ; जारी केला एक व्हॉट्सअप नंबर
- ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्राने महाराष्ट्राला दिल्या ८ महत्वाच्या सूचना ; वाचा सविस्तर
- … मुख्यमंत्रिपदाची धुरा रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवा; चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला कोपरखळी