• Download App
    भारताचे ज्युनिअर चार्ली चॅप्लिन विवेक यांचे तमिळनाडूत निधन |Actor vivek passed away

    भारताचे ज्युनिअर चार्ली चॅप्लिन विवेक यांचे तमिळनाडूत निधन

    विशेष प्रतिनिधी 

    चेन्नई : भारताचे ज्युनिअर चार्ली चॅप्लिन अशी उपाधी मिळवणारे, पद्मश्री सन्मानित तमीळ विनोदी अभिनेते विवेक (वय ५९) यांचे हृदयाच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.Actor vivek passed away

    दोन दिवसांपूर्वीच त्यांनी कोव्हॅक्सिनची लस घेतली होती. त्यांचा मृत्यू हा हृदयाच्या झटक्याने झाला असून त्याचा लसीकरणाची काही संबंध नाही, असा खुलासा उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे.



    पद्मश्री पुरस्काराने सन्मानित विवेक लोकसेवा आयोगाची परीक्षाही उत्तीर्ण झाले होते. दिवंगत दिग्दर्शक के. बालचंदर यांनी ‘मनथिल उरुथी वेंदम’ या चित्रपटात प्रथम संधी दिली. तमिळनाडूतील बहुतेक सर्व मुख्य अभिनेच्याबरोबर त्यांनी सुमारे २०० चित्रपटात भूमिका केल्या.

    सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर ते ‘शिवाजी’ आणि ‘अन्नीयान’ या चित्रपटांमध्ये झळकले. सामाजिक कार्यकर्ते अशीही त्यांनी ओळख होती. विविध भूमिका साकारताना सामाजिक संदेश देण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असे. माजी राष्ट्रपती अबद्ल कलाम यांच्याशी त्यांचा निकटचा स्नेह होता

    Actor vivek passed away

    Related posts

    Masood Azhar : युद्धबंदीचे उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार सैन्यदलास देण्यात आले आहेत.

    व्यापाराचे हत्यार वापरून अमेरिकेनेच भारत – पाकिस्तानचे अणुयुद्ध थांबविले, अन्यथा लाखो लोक मेले असते; मोदींच्या भाषणाआधी डोनाल्ड ट्रम्प यांचे निवेदन!!

    EOS-09 satellite : भारतीय सैन्याला मोठी ताकद मिळणार, इस्रो EOS-09 उपग्रह प्रक्षेपित करणार