• Download App
    अभिनेता सचिन जोशीने जिंकला राज कुंद्राविरोधातील खटला, १८ लाख रुपयांचे सोने मिळणार परत|Actor Sachin Joshi wins lawsuit against Raj Kundra, gets gold worth Rs 18 lakh back

    अभिनेता सचिन जोशीने जिंकला राज कुंद्राविरोधातील खटला, १८ लाख रुपयांचे सोने मिळणार परत

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: अश्लिल चित्रपट बनविल्याप्रकरणी अटकेत असलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अध्यक्ष असलेल्या सतयुग गोल्डविरोधातील खटला अभिनेता सचिन जोशी याने जिंकला आहे.Actor Sachin Joshi wins lawsuit against Raj Kundra, gets gold worth Rs 18 lakh back

    सचिन जोशी याने सतयुग गोल्डमध्ये १८ लाख ५७ हजार रुपये गुंतवून सोने खरेदी केले होते. त्याला २५ लाख रुपये मिळणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु ते न मिळाल्याने सचिन जोशीने न्यायालयात धाव घेतली होती.



    सचिन जोशी याने तक्रारीत आरोप केला आहे की, सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपली फसवणूक केली होती. या कंपनीकडून त्याने एका सोन्याच्या योजनेत एक किलो किमतीचे सोने खरेदी केले होते. त्याबदल्यात २५ लाख रुपये मिळतील असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, हे पैसे मिळाले नाहीत.

    सचिन जोशी म्हणाला की, माझी कायदेशीर लढाई ही केवळ माझ्यासाठी नव्हती तर सतयुग गोल्डच्या कित्येक गुंतवणूकदारांसाठी होती. त्यांना सोन्याच्या गुंतवणुकीचे आमिष दाखविण्यात आले होते. मी स्वत: सहा वषार्पूर्वी 18,57,870 रुपये गुंतविले होते.

    मात्र, हे पैसे मिळाले नाही. न्यायालयाने आम्हाला न्याय दिला असून आम्हाला आमचे 1 किलो सोने परत मिळाले आहे. त्याचबरोबर कायदेशिर प्रक्रियेचा खर्च म्हणून तीन लाख रुपयांची भरपाईही मिळाली आहे.

    Actor Sachin Joshi wins lawsuit against Raj Kundra, gets gold worth Rs 18 lakh back

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानात पुन्हा ड्रोन दिसले; होशियारपूरमध्ये 5-7 स्फोट, ब्लॅकआऊट

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!