• Download App
    भूतानमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगात ; 60 टक्के लोकांना डोस । Accelerating corona preventive vaccination campaign in Bhutan; Dose to 60% of people

    भूतानमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगात ; ६० टक्के लोकांना डोस

    वृत्तसंस्था

    थिंपू : भूतानमध्ये 60 टक्के लोकसंख्येपर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लस पोचली आहे. आठवडाभरापूर्वी या देशात लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली होती. Accelerating corona preventive vaccination campaign in Bhutan; Dose to 60% of people

    भारत आणि चीनदरम्यान, असणाऱ्या या राष्ट्रात 770,000 पैकी 470,000 जणांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला आहे. भारताकडून  कोविशील्ड लसीचा डोस देण्यात आला. एएफपीच्या सर्वेक्षणानुसार भूताननं इस्रायल, संयुक्त अरब अमीरात या देशांप्रमाणंच अतिशय वेगानं लसीकरण मोहिम पार पाडली आहे.



    लसीकरण मोहिमेत गरोदर महिला, बाळाला नुकत्याच जन्म दिलेल्या माता, लहान मुलं आणि गंभीर आजार असणारे रुग्ण वगळता इतर सर्वांनाच लस देण्याचं लक्ष्य ठेवलं होतं.  सध्या 70 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांसोबत विकलांग नागरिकांना लस देण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत 896 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यामध्ये एका मृत्यूची नोंद झाली आहे.

    Accelerating corona preventive vaccination campaign in Bhutan; Dose to 60% of people

    Related posts

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार