• Download App
    वर्षात बांधले तब्बल आठ हजार ४५ किलोमीटर लांबीचे रस्ते, नितीन गडकरी यांची माहिती|About 8,045 km of roads built during the year, according to Nitin Gadkari

    वर्षात बांधले तब्बल आठ हजार ४५ किलोमीटर लांबीचे रस्ते, नितीन गडकरी यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गेल्या आर्थिक वर्षांत फेब्रुवारी २०२२पर्यंत देशभरात ८,०४५ किलोमीटर रस्ते बांधण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.About 8,045 km of roads built during the year, according to Nitin Gadkari

    नितीन गडकरी म्हणाले, देशभरात महामार्ग आणि द्रुतगती मागार्ची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग आणि पायभूत विकास महामंडळाकडे आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षांत १०,२३७ किलोमीटर, २०२०-२१मध्ये ८,०४५ किलोमीटर आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षांत ८,०४५ किलोमीटर रस्तेबांधणी करण्यात आली.



    पाच वर्षांच्या कालावधीत म्हणजेच २०२९-२० ते २०२३-२४ पर्यंत ६०,००० किलोमीटरचे रस्ते बांधण्याचे नियोजन असून फेब्रुवारी २०२२ पर्यंत ३१,६०९ रस्तेबांधणी झाली आहे. २८,३९१ किलोमीटर रस्तेबांधणीचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण केले जाईल.

    रस्ते अपघातातत जीव गमावणाऱ्यांत भारत देश जगात सगळ्यात पुढे असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, रस्ते अपघात आणि अपघातातील मृत्यू रोखण्याबाबत सरकार गंभीर असून यावर सातत्यानं काम होत आहे. दरम्यान, युद्धामुळे किंवा कोविडपेक्षाही सर्वात जास्त मृत्यू जर कोणत्या कारणामुळे देशात झाले असतील,

    तर ते रस्ते अपघातामुळे झाले आहेत. कोविडच्या लॉकडाऊन काळातही रस्ते अपघातातील मृतांची आकडेवारी ही दुर्भाग्यपूर्ण आहे. दोनपेक्षा जास्त वेळा एकाच ठिकाणी अपघात झाला, तर त्या ठिकाणाला ब्लॅक स्पॉट घोषित केलं जात आहे. याबाबतचे अधिकारही स्थानिक अधिकाºयांना देण्यात आले आहेत. देशातील राष्ट्रीय महामार्गांवर तब्बल पावणे चार हजार ब्लॅक स्पॉट आहेत.

    About 8,045 km of roads built during the year, according to Nitin Gadkari

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे