• Download App
    आत्मनिर्भर खादीने दिला व्होकल फॉर लोकलचा नारा, कोरोना काळातही खादी ग्रामोद्योग मंडळाची विक्रमी उलाढाल|Aatmnirbhar khadi gives the slogan of Vocal for Local, Khadi Village Industries Board's record turnover even during Corona period

    आत्मनिर्भर खादीने दिला व्होकल फॉर लोकलचा नारा, कोरोना काळातही खादी ग्रामोद्योग मंडळाची विक्रमी उलाढाल

    कोरोना काळातही खादी ग्रामोद्योग मंडळाने विक्रमी व्यवसाय केला आहे. 2020-21 मध्ये खादी ग्रामोद्योग आयोगाने 95 हजार 741 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल नोंदविली आहे. 2019-20 दरम्यान आयोगाने 88 हजार 887 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. कोरोनाकाळात नागरिकांनी खादीच्या आभासी पोर्टलवरून मुखाच्छादन (मास्क), जंतुनाशकांसह कपड्यांची देखील खरेदी केली.Aatmnirbhar khadi gives the slogan of Vocal for Local, Khadi Village Industries Board’s record turnover even during Corona period


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना काळातही खादी ग्रामोद्योग मंडळाने विक्रमी व्यवसाय केला आहे. 2020-21 मध्ये खादी ग्रामोद्योग आयोगाने 95 हजार 741 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल नोंदविली आहे. 2019-20 दरम्यान आयोगाने 88 हजार 887 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

    कोरोनाकाळात नागरिकांनी खादीच्या आभासी पोर्टलवरून मुखाच्छादन (मास्क), जंतुनाशकांसह कपड्यांची देखील खरेदी केली.मागील वर्षी 25 मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे उत्पादन कार्य तीन महिन्यांहून अधिक काळ बंद राहिल्याने 2020-21 मधील खादी आयोगाच्या विक्रमी कामगिरीला महत्त्व आहे.



    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकल च्या केलेल्या आवाहनावर खादी आयोगाने विक्रमी भरारी घेतली. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या उलाढालीत ७.७१ टक्के वाढ झाली आहे. २०१५-१६ या वर्षाच्या तुलनेत खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या उलाढालीत तब्बल १०१ टक्के वाढ झाली आहे.

    विक्रीमध्ये या काळात १२८.६६ टक्के वाढ झाली आहे. खादी ई-पोर्टल, खादी मास्क, खादी चपला, खादी नैसर्गिक रंग, खादी हॅँड सॅनिटायझर या प्रकारची नवीन उत्पादने या काळात आणण्यात आली.यासह सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या अनोख्या विपणन संकल्पनाच्या आधारे खादीने आपल्या उत्पादनांमध्ये विविधता आणली.

    कोरोनामुळे नागरिकांनी देखील विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकत स्वदेशीचा मंत्र अवलंबला.महामारीच्या काळात लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. या काळात खादीने कामगार आणि बेरोजगार तरुणांसाठी कायमस्वरूपी रोजगार निर्मितीवर विशेष लक्ष केंद्रित केले, अशी माहिती खादी आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांनी दिली.

    आर्थिक संकटाला सामोरे जात असताना आयोगाने मोठ्या संख्यने तरुणांसाठी स्वयंरोजगार आणि उत्पादन उपक्रम राबविले ज्यामुळे ग्रामीण उद्योग क्षेत्रात उत्पादन वाढले. पंतप्रधानांनी स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याच्या आवाहनानंतर खादी व ग्रामोद्योगांची जलद विक्री झाली.

    Aatmnirbhar khadi gives the slogan of Vocal for Local, Khadi Village Industries Board’s record turnover even during Corona period

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला