• Download App
    आफताबचा लव्ह जिहाद पॉलिग्राफ टेस्ट मधून उघड; म्हणाला, फाशी झाली तरी चालेल, जन्नत मध्ये हूर मिळतील Aaftab poonawala has Islamic jihadi mentality, polygraph test made it clear

    आफताबचा लव्ह जिहाद पॉलिग्राफ टेस्ट मधून उघड; म्हणाला, फाशी झाली तरी चालेल, जन्नत मध्ये हूर मिळतील

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : लव्ह जिहाद मधून श्रद्धा वालकरची हत्या करून तिचे 35 तुकडे करणाऱ्या आफताब अमीन पूनावालाची कट्टर इस्लामी जिहादी मानसिकता उघड झाली असून पॉलिग्राफ टेस्टमध्येच त्याने त्याची कबुली दिली आहे. पॉलिग्राफ टेस्ट दरम्यान आफताब म्हणाला, मला फाशी झाली तरी चालेल. कारण जन्नत मध्ये मला हूर मिळतील. म्हणजे स्वर्गात मला अप्सरा मिळतील!! Aaftab poonawala has Islamic jihadi mentality, polygraph test made it clear

    आफताबच्या पॉलिग्राफ टेस्ट मधून तो कट्टर इस्लामी जिहादी असल्याचा स्पष्टच खुलासा झाल्यानंतर आता दिल्ली पोलीस त्याची नार्को टेस्टही करणार आहेत. पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दैनिक जागरणने ही बातमी दिली आहे.

    – आफताबचे 20 हिंदू मुलींशी संबंध

    श्रद्धा वालकर हिची हत्या करून तिचे 35 तुकडे केल्याचा घटनेचा आफताब अमीन पूनावाला याला अजिबात पश्चाताप झालेला नाही. आपल्या पॉलिग्राफ टेस्ट दरम्यान त्याने उघडपणे पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले की, श्रद्धाच्या हत्येबद्दल त्याला फाशी झाली तरी हरकत नाही. कारण जन्नत मध्ये त्याला हूर मिळणार आहे. श्रद्धा बरोबर त्याचा लव्ह जिहाद सुरू असताना अन्य 20 हिंदू मुलींबरोबर देखील त्याचे संबंध होते. बंबल ॲप द्वारे त्याने या 20 हिंदू मुलींशी संबंध प्रस्थापित केले होते. श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याने एका हिंदू मानसोपचार तज्ञ मुलीला देखील घरी आणले होते. श्रद्धाची अंगठी आफताबने त्या मुलीला भेट दिली होती. अशा किमान 20 हिंदू मुली त्याने आपल्या लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवल्या होत्या.

    आफताबला पश्चाताप नाही

    श्रद्धा वालकर हिची हत्या केल्याचा आफताबला अजिबात पश्चाताप झालेला नाही. आधीच्या पोलीस चौकशीत आणि सध्या सुरू असलेल्या पॉलिग्राफ टेस्ट मध्ये तो पोलिसांना वेगवेगळी माहिती देऊन गुमराह करण्याचा प्रयत्न करतो आहे. आफताब किती शातिर खिलाडी आहे, याचा उल्लेख एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने केला आहे. दिवसभराच्या चौकशी आणि पॉलिग्राफ टेस्टनंतर आफताब शांत झोपतो. त्याच्या समावेत कोठडीत ठेवलेल्या दोन कैद्यांशी थोड्या गप्पा मारतो. पण या सर्व कालावधीत त्याच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव दिसत नाही किंवा त्याला श्रद्धाची हत्या केल्याचा पश्चाताप देखील होत नाही. श्रद्धाची हत्या करायचा निर्णय आफताबने मुंबईत असतानाच घेतला होता. त्याची माहिती देखील आफताबने पोलिसांना आधीच्या चौकशीत आणि नंतरच्या पॉलिग्राफ टेस्टमध्ये दिली.

    आफताबने चौकशी दरम्यान जी धक्कादायक माहिती सांगितली आहे, त्याची पोलिस आता पुढची नार्को टेस्ट करून पुष्टी करणार आहेत. पण या सगळ्या चौकशीत आफताब हा शातिर खिलाडी आणि कट्टर इस्लामी जिहादी मानसिकतेचाच तरुण असल्याचेच पोलिसांचे स्पष्ट मत बनले आहे. त्याची केस ते कायदेशीर दृष्ट्या जास्तीत जास्त बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत.



    माध्यमांचे सॉफ्ट नॅरेटिव्ह

    आफताबच्या केस मध्ये वेगवेगळे रिपोर्टिंग ज्या पद्धतीने माध्यमांमध्ये येत आहे, त्यातून त्याला कायदेशीर कचाट्यातून सोडवण्याचे प्रयत्न दिसून येत आहेत. त्याची जिहादी मानसिकता, लव्ह जिहाद मधून त्याने केलेला श्रद्धाची हत्या या महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल देऊन अनुषंगिक गोष्टींचे रिपोर्टिंग माध्यमांमध्ये सुरू असल्याची पोलिसांना पूर्ण कल्पना आहे. आफताबने आपण रागाच्या भरात श्रद्धाचा गळा दाबून खून केल्याचे पोलिसांना सुरुवातीला सांगितले होते. यातले रागाच्या भरात केलेला खून असेच नॅरेटिव्ह माध्यमे चालवत आहेत.

    मात्र पोलिसांनी या केसमध्ये चौकशी आणि तपासाचा पूर्ण फोकस श्रद्धाची लव्ह जिहाद मधून आफताबने केलेली हत्या आणि चौकशी तपासा दरम्यान त्याची समोर आलेली कट्टर इस्लामी जिहादी मानसिकता यावर ठेवला आहे. पोलीस त्यादृष्टीनेच आफताब विरोधात सर्व पुरावे गोळा करत आहेत.

    Aaftab poonawala has Islamic jihadi mentality, polygraph test made it clear

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!