• Download App
    एकदम फिल्मी, मेहूल चोक्सीच्या अटकेबाबत गौप्यस्फोट, मैत्री करून महिलेने केले अपहरण|A very filmy, gossip about the arrest of Mehul Choksi, a woman who pretend herself as friend kidnapped

    एकदम फिल्मी, मेहूल चोक्सीच्या अटकेबाबत गौप्यस्फोट, मैत्री करून महिलेने केले अपहरण

    पंजाब नॅशनल बॅँक घोटाळ्यातील आरोपी हिरे व्यापारी मेहूल चोक्सीच्या अटकेची कहाणी एकदम फिल्मी बनली आहे. मैत्रीच्या जाळ्यात अडकवून एका महिलेनेच त्याचे अपहरण केल्याचे उघड झाले आहे. चोक्सीला डॉमिनिका येथे पोलिसांनी अटक केली आहे.A very filmy, gossip about the arrest of Mehul Choksi, a woman who pretend herself as friend kidnapped


    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅँक घोटाळ्यातील आरोपी हिरे व्यापारी मेहूल चोक्सीच्या अटकेची कहाणी एकदम फिल्मी बनली आहे. मैत्रीच्या जाळ्यात अडकवून एका महिलेनेच त्याचे अपहरण केल्याचे उघड झाले आहे. चोक्सीला डॉमिनिका येथे पोलिसांनी अटक केली आहे.

    एखाद्या गडगंज उद्योजकाला प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्याचे अपहरण केल्याचे अनेक प्रकार चित्रपटांतून पाहिले असतील. चोक्सीबाबतही असेच घडले असावे अशी शक्यता आहे. मेहुल चोक्सी डॉमिनिकाला पोहचला तेव्हा त्याच्यासोबत एक महिला होती.



    परंतु ती त्याची गर्लफ्रेंड नव्हती तर त्याचं अपहरण करणाऱ्या टोळीची सदस्या होती. या टोळीने मेहुल चोक्सीचं अपहरण केले. त्याला मारहाण केली. त्यानंतर चोक्सीला डॉमिनिका येथे पोलिसांनी अटक केली आहे.

    काही दिवसांपूर्वी मेहुल चोक्सी अँटिग्वा आणि बरबुडा येथून गायब झाला होता. त्यानंतर तो डॉमिनिका येथे असल्याचे समोर आले. २३ मे रोजी मेहुलचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण करणाºयांचे भारतासोबत कनेक्शन आहे

    आणि ते अँटिग्वा येथील अधिकाºयांच्या मदतीनं हे अपहरण झाले. अपहरण करणाऱ्यांनी मेहुल चोक्सीला मारहाण केली. त्याला टॉर्चर केले. त्यानंतर एका बोटीच्या सहाय्याने डॉमिनिकाला आणलं गेले. त्याठिकाणी चोक्सीला अटक झाली, असा आरोप चोक्सीच्या वकीलाने केला आहे.

    मात्र, याबाबतची कहाणी वेगळीच आहे. अपहरणात सहभागी असलेली महिला अँटिग्वा येथे राहत होती. या महिलेने सुरुवातीला मेहुल चोक्सीसोबत ओळख वाढविली. सकाळी, संध्याकाळी मेहुल बाहेर फिरण्यासाठी जात होता तिथेच या महिलेने सापळा रचला होता.

    त्यानंतर या दोघांमध्ये मैत्री झाली. २३ मे रोजी या महिलेने मेहुल चोक्सीला ती राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये भेटण्यासाठी बोलावले. मेहुल ज्यावेळी तिच्या घरी पोहचला तेव्हा अपहरण करणारे अन्य साथीदार तिथेच होते. या सगळ्यांनी मेहुलचं अपहरण करून त्याला डॉमिनिकाला आणले.

    रविवारी अँटिग्वा आणि बरबुडा पंतप्रधान ग्रॅस्टोन ब्राऊनने सांगितले की, मेहुल चोक्सी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत डॉमिनिकाला गेला होता. तिथे त्याला पकडण्यात आलं. ग्रॅस्टन यांनी डॉमिनिका सरकारला आवाहन करून मेहुल चोक्सीला थेट भारतात पाठवलं जावं असं म्हटलं.

    शनिवारी रात्री पोलीस कोठडीत असलेल्या मेहुल चोक्सीचे फोटो व्हायरल झाले. फोटोत मेहुल चोक्सी जेलच्या कोठडीत होता आणि त्यांच्या हातावर मारहाण झालेल्या खूणा दिसून येत होत्या. त्याचसोबत त्याचे डोळे लाल झाले होते आणि शरीरात थकवा असल्याचं जाणवत होते.

    डॉमिनिकावरून त्याला भारतात आणण्यासाठी सीबीआयची एक टीम शारदा राऊत या आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली गेली आहे. चोक्सीला न्यायालयात हजर केल्यावर त्याला भारताकडे सोपविले जाण्याची शक्यता आहे.

    A very filmy, gossip about the arrest of Mehul Choksi, a woman who pretend herself as friend kidnapped

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती