• Download App
    एअर फोर्स डे निमित्त हवाई दलाच्या सेवेला एका कलावंताचा अनोखा सलाम!! । A unique salute to the service of the Air Force on the occasion of Air Force Day !!

    एअर फोर्स डे निमित्त हवाई दलाच्या सेवेला एका कलावंताचा अनोखा सलाम!!

    वृत्तसंस्था

    भुवनेश्वर : आज एकूण 89 वा एअर फोर्स डे आहे. या निमित्ताने राजधानी नवी दिल्लीत मोठा समारंभ झाला. त्याला सर्वोच्च लष्करी आणि हवाईदल अधिकारी उपस्थित होते. A unique salute to the service of the Air Force on the occasion of Air Force Day !!

    पण ओरिसातल्या एका कलावंताने या दिवसाच्या निमित्ताने हवाईदलाच्या सेवेला अनोखा सलाम केला आहे. शाश्वत किशोर साहू या कलावंताने आग पेटीतल्या 1360 काड्या वापरून 1925 मधील “वेस्टलंड वापिती” या मॉडेलच्या विमानाची निर्मिती केली आहे. 40 इंच रुंद आणि 36 इंच लांब एवढे हे मॉडेल शाश्वत किशोर साहू यांनी तयार करून भारतीय हवाई दलाला समर्पित केले आहे. हे मॉडेल तयार करायला साहू यांना चार दिवसांची मेहनत घ्यावी लागली.

    भारतीय हवाई दलाची परंपरा ब्रिटिश राजवटीत सुरू झाली असली तरी सेवेची उत्कृष्ट परंपरा भारतीयांनी जपली आहे. एअर मार्शल अर्जन सिंग, ऋषिकेश मुळगावकर यांच्यासारखे सर्वोच्च अधिकारी हवाई सेवेने भारतीयांना दिले आहेत. हवाई दलाची युद्धकाळात आणि शांततेच्या काळातही सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. पाकिस्तान विरुद्ध 1965, 1971 आणि 1999 चे कारगील युद्ध या काळात हवाई दलाने सर्वोत्तम कामगिरी करून भारतीय सैन्याला निर्णायक विजय प्राप्त करून दिले आहेत. याची आठवण हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी आवर्जून करून दिली आहे.

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय हवाई दलाला एअर फोर्स डे निमित्त विशेष संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्लीतील कार्यक्रमात जनरल बिपिन रावत, लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, नौदल प्रमुख ॲडमिरल करमबिर सिंग हे उपस्थित होते. दिल्लीत असा रंगारंग कार्यक्रम होत असताना सुदूर ओरिसातील एका कलावंताने आगपेटीतील काड्यांच्या सहाय्याने विमानाचे मॉडेल बनवून हवाई दलाच्या सेवेला अनोखा सलाम केला आहे.

    A unique salute to the service of the Air Force on the occasion of Air Force Day !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!