• Download App
    मेहूल चोक्सीच्या फिल्मी कहाणीत ट्विस्ट, चोक्सी राज बनून मला भेटला, प्रेमाचे नाटक करताना हिऱ्याची अंगठी दिली मात्र नकली निघाली, कथित गर्लफ्रेंड बार्बरा जराबिका पहिल्यांदाच आली समोर|A twist in Mehul Choksi's filmy story, Choksi met me as Raj, gave me a diamond ring while pretending to be in love but it turned out to be fake, alleged girlfriend Barbara Jarabika came in front for the first time

    मेहूल चोक्सीच्या फिल्मी कहाणीत ट्विस्ट, चोक्सी राज बनून मला भेटला, प्रेमाचे नाटक करताना हिऱ्याची अंगठी दिली मात्र नकली निघाली, कथित गर्लफ्रेंड बार्बरा जराबिका पहिल्यांदाच आली समोर

    फरार हिरे व्यापारी आणि पंजाब नॅशनल बॅँके घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सीची कथित गर्लफ्रेंड बार्बरा जराबिका प्रथमच समोर आली आहे. मेहूल आपल्याला राज बनून भेटला. सुरूवातीच्या ओळखीनंतर प्रेमाचे नायक सुरू केले. त्याने मला हिऱ्याची अंगठी आणि ब्रेसलेटही भेट म्हणून दिले होते. मात्र, ते नकली निघाले अशी तिने सांगितले आहे.A twist in Mehul Choksi’s filmy story, Choksi met me as Raj, gave me a diamond ring while pretending to be in love but it turned out to be fake, alleged girlfriend Barbara Jarabika came in front for the first time


    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : फरार हिरे व्यापारी आणि पंजाब नॅशनल बॅँके घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सीची कथित गर्लफ्रेंड बार्बरा जराबिका प्रथमच समोर आली आहे. मेहूल आपल्याला राज बनून भेटला. सुरूवातीच्या ओळखीनंतर प्रेमाचे नायक सुरू केले. त्याने मला हिऱ्याची अंगठी आणि ब्रेसलेटही भेट म्हणून दिले होते. मात्र, ते नकली निघाले अशी तिने सांगितले आहे.

    ‘इंडिया टूडे’ या वृत्तवाहिनीला बार्बराने मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिने मेहूल चोक्सीबरोबरचा सर्व प्रवास सांगताना त्याच्या अपहरणात आपला कोणताही हात नसल्याचे स्पष्ट केले आहे. बार्बरा म्हणाली, मेहुल चोक्सी आपल्याला मागच्या वर्षी अँटिग्वाच्या भेटीदरम्यान भेटला होता.



    त्याने स्वत:ची ओळख राज म्हणून करून दिली होती. आमच्या मैत्री झाली आणि नंतर त्याने फ्लर्ट करायला सुरुवात केली. त्याने मला डायमंड रिंग आणि ब्रेसलेट गिफ्ट म्हणून ते नकली असल्याचे नंत आढळून आले.

    चोक्सीच्या अपहरणात आपला कसलाही सहभाग नाही. मेहुल चोक्सीच्या वकिलांकडून आणि त्याच्या कुटुंबियांकडून यात माझं नाव जबरदस्ती घेतलं जात आहे. यामुळे मी आणि माझं कुटुंब सध्या तणावाखाली जगत आहोत, असे जराबिकाने म्हटले आहे.

    पंजाब नॅशनल बॅँक घोटाळ्यातील आरोपी हिरे व्यापारी मेहूल चोक्सीच्या अटकेची कहाणी एकदम फिल्मी बनली आहे. मत्रैीच्या जाळ्यात अडकवून एका महिलेनेच त्याचे अपहरण केल्याचे उघड झाले आहे. चोक्सीला डॉमिनिका येथे पोलिसांनी अटक केली आहे.

    काही दिवसांपूर्वी मेहुल चोक्सी अँटिग्वा आणि बरबुडा येथून गायब झाला होता. त्यानंतर तो डॉमिनिका येथे असल्याचे समोर आले. २३ मे रोजी मेहुलचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण करणाऱ्यांचे भारतासोबत कनेक्शन आहे आणि ते अँटिग्वा येथील अधिकाऱ्यांच्या मदतीनं हे अपहरण झाले.

    अपहरण करणाऱ्यांनी मेहुल चोक्सीला मारहाण केली. त्याला टॉर्चर केले. त्यानंतर एका बोटीच्या सहाय्याने डॉमिनिकाला आणलं गेले. त्याठिकाणी चोक्सीला अटक झाली, असा आरोप चोक्सीच्या वकीलाने केला आहे. अपहरणात सहभागी असलेली महिला अँटिग्वा येथे राहत होती.

    या महिलेने सुरुवातीला मेहुल चोक्सीसोबत ओळख वाढविली. सकाळी, संध्याकाळी मेहुल बाहेर फिरण्यासाठी जात होता तिथेच या महिलेने सापळा रचला होता. त्यानंतर या दोघांमध्ये मैत्री झाली.

    २३ मे रोजी या महिलेने मेहुल चोक्सीला ती राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये भेटण्यासाठी बोलावले. मेहुल ज्यावेळी तिच्या घरी पोहचला तेव्हा अपहरण करणारे अन्य साथीदार तिथेच होते. या सगळ्यांनी मेहुलचं अपहरण करून त्याला डॉमिनिकाला आणले, असे त्यांनी म्हटले होते.

    बार्बरा समोर का येत नाही असा आरोप मेहूलची बायको प्रीती चोक्सी यांनी केला होता. मात्र, आता बार्बराने समोर येऊन सर्व काही सांगितले असल्याने आता या कहाणीत ट्विस्ट आला आहे.

    A twist in Mehul Choksi’s filmy story, Choksi met me as Raj, gave me a diamond ring while pretending to be in love but it turned out to be fake, alleged girlfriend Barbara Jarabika came in front for the first time

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य