• Download App
    कॅन्सरग्रस्त तीन वर्षांच्या बालकाने केली कोरोनावर मात आणि वाराणसीतील रुग्णालयात आनंदोत्सव A three-year-old boy with cancer overcame Corona and celebration at a hospital in Varanasi

    कॅन्सरग्रस्त तीन वर्षांच्या बालकाने केली कोरोनावर मात आणि वाराणसीतील रुग्णालयात आनंदोत्सव

    देशात कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढत आहे. मात्र, वाराणसीतील होमी भागा कॅन्स रुग्णालयातील तीन वर्षांच्या कॅन्सरग्रस्त बालकाने कोरोनावर मात केली. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सनी आनंदोत्सव साजरा केला. A three-year-old boy with cancer overcame Corona and celebration at a hospital in Varanasi


    प्रतिनिधी

    वाराणसी : देशात कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढत आहे. मात्र, वाराणसीतील होमी भाभा कॅन्सर रुग्णालयातील तीन वर्षांच्या कॅन्सरग्रस्त बालकाने कोरोनावर मात केली. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सनी आनंदोत्सव साजरा केला.

    कोरोनाच्या तिसºया लाटेत बालकांना संक्रमणाचा धोका सांगितला जात आहे. मात्र, बालकांमध्ये कोरोनाविरुध्द लढण्याची क्षमताही अधिक असते हे वाराणसीतील घटनेतून समोर आले आहे. सात दिवसांपूर्वी ब्लड कॅन्सर असलेला एक तीन वर्षांचा मुलगा रुग्णालयात दाखल झाला होता. यावेळी कोणालाही वाटत नव्हते की त्याचे प्राण वाचतील.



    परंतु, डॉक्टरांनी हिंमत सोडलेली नव्हती. त्याच्यावर उपचार सुरू होते. या उपचारांना यश येऊन या बालकाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. यावेळी पीपीई किट घातलेल्या डॉक्टर आणि नर्सनी आनंदोत्सव साजरा केला. रुग्णालयातील अन्य रुग्णही टाळ्या वाजवित त्यामध्ये सहभागी झाले.

    या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डॉक्टर आणि नर्सचे सर्वजण कौतुक करत आहेत. रुणालयाचे संचालक डॉ. पंकज चर्तुेदी म्हणाले, या रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण हे गंभीर अवस्थेत असतात. त्यांच्यात उमेद जागविण्यासाठी आम्ही विविध उपक्रम करतो. गेल्या २२ दिवसांत कॅन्सरग्रस्त असलेले २०९ कोरोना रुग्ण बरे होऊन गेले आहेत.

    A three-year-old boy with cancer overcame Corona and celebration at a hospital in Varanasi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!