• Download App
    लागला नंबर : दिल्ली दारू घोटाळ्याच्या तपासासाठी अरविंद केजरीवालांना सीबीआयचे समन्स; परवाच 16 एप्रिलला हजेरी A notice has been served (by CBI). On 16th April, Arvind Kejriwal will appear before them

    लागला नंबर : दिल्ली दारू घोटाळ्याच्या तपासासाठी अरविंद केजरीवालांना सीबीआयचे समन्स; परवाच 16 एप्रिलला हजेरी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : लागला नंबर… दिल्ली दारू घोटाळ्याच्या तपासासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना सीबीआयने समन्स पाठवले आहे. ज्या दारू घोटाळ्यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तिहार जेलमध्ये आहेत, त्याच दारू घोटाळ्याच्या चौकशीसाठी आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने समन्स पाठविले आहे. त्यामुळे दारू घोटाळ्याच्या प्रत्यक्ष तारा नेमक्या कुठे जोडल्या आहेत?, हे स्पष्ट होत आहे. A notice has been served (by CBI). On 16th April, Arvind Kejriwal will appear before them

    दिल्ली दारू घोटाळ्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. सी. चंद्रशेखर राव यांची कन्या आमदार के. कविता यांची ईडी आणि सीबीआयने आधी चौकशी केलीच आहे. पुढील चौकशी आणि तपासासाठी त्यांनाही लवकरच समन्स पाठविण्यात येणार आहे.



    पण त्याआधी आता अरविंद केजरीवाल यांना सीबीआय तपासासाठी परवा म्हणजे 16 एप्रिल रोजी हजर राहायला सांगितले आहे.

    आम आदमी पार्टीला तीनच दिवसांपूर्वी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर पक्षांमध्ये अत्यानंदाचे वातावरण होते. त्यावेळी केलेल्या भाषणात अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन हे आपले दोन मंत्री आज जेलबाहेर आपल्या समावेत हवे होते, असा विचार व्यक्त केला होता. आज देखील आंबेडकर जयंती समारोहात केजरीवालांनी तोच विचार बोलून दाखविला. मनीष सिसोदिया यांना जेलमध्ये घालणारे खरे देशद्रोही आहेत. कारण त्यांना या देशाचा विकास, सर्वसामान्य जनतेची तरक्की, बालकांना उत्तम दर्जाचे शिक्षण देणे हे सर्व नको आहे. भारताचे संविधान त्यांना टोचते असा आरोप केला होता.

    त्या समारंभाचे भाषण सुरू असतानाच अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने दारू घोटाळ्याच्या तपासासाठी समन्स पाठवण्याची बातमी आली आहे. ती देखील 16 एप्रिल रोजी हजर राहण्याची बातमी आहे. आम आदमी पार्टीने समन्स मिळाल्याची बातमी कन्फर्म केली आहे.

    A notice has been served (by CBI). On 16th April, Arvind Kejriwal will appear before them

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य