• Download App
    एकाच दिवशी 72.42 लाखांपेक्षा जास्त ITR दाखल करण्याचा नवा विक्रम : 31 जुलैपर्यंत 5.83 कोटी विवरणपत्रे दाखल|A new record of filing more than 72.42 lakh income tax returns on a single day, about 5.83 crore returns filed till 31st July 2022

    GST Collection : जुलैमध्ये जीएसटी संकलन १.४९ लाख कोटी रुपये, तब्बल २८% वाढ; करचोरीही घटली

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : करदाते आणि कर व्यावसायिकांनी वेळेचे पालन करत आयकर परतावा भरला, त्यामुळे प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरण्यात वाढ झाली, परिणामी एकाच दिवशी विक्रमी आयटीआर दाखल करण्यात आले. आयकर विभागाने याबद्दल करदाते आणि कर व्यावसायिकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.A new record of filing more than 72.42 lakh income tax returns on a single day, about 5.83 crore returns filed till 31st July 2022

    31 जुलै 2022 या दिवशी (पगारदार करदात्यांची आणि इतर गैर कर लेखापरीक्षण प्रकरणांची देय तारीख) आयटीआर दाखल करण्यात वाढ होऊन एकाच दिवशी म्हणजे 31 जुलै, 2022 रोजी 72.42 लाखांहून अधिक आयटीआर दाखल केले गेले. मूल्यांकन वर्षे 22-23 साठी 31 जुलै 2022 पर्यंत दाखल केलेले एकूण आयटीआर सुमारे 5.83 कोटी आहेत.



    ई-फायलिंग पोर्टलने देखील 31 जुलै 2022 रोजी नवे मानक निर्धारित केले. या दिवशी आयटीआर फाइलिंगचा सर्वोच्च वेग प्रति सेकंद : 570 (4:29:30 वाजता), आयटीआर फाइलिंगचा सर्वोच्च वेग प्रति मिनिट : 9573 (संध्याकाळी 7:44 वाजता) ), आणि आयटीआर फाइलिंगचा सर्वोच्च वेग प्रति तास : 5,17,030, (संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 6 दरम्यान) इतका नोंदवला गेला.

    मूल्यांकन वर्ष 22-23 साठीचे पहिले 1 कोटी आयटीआर 7 जुलै, 2022 पर्यंत दाखल झाल्यामुळे ई-फायलिंगची सुरुवातीची गती तुलनेने खूपच कमी होती. 22 जुलै, 2022 पर्यंत सुमारे 2.48 कोटी आयटीआर दाखल करण्यात आल्याने ही गती किरकोळ वाढली. देय तारखेला कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही,

    असे सरकारने जाहीर केल्याने, आयटीआर भरण्यात मोठी वाढ झाली आणि 25 जुलै 2022 पर्यंत 3 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले. 31 जुलै, 2022 रोजी दिवसअखेर मागील सर्व विक्रम मोडीत काढत 72.42 लाख आयटीआर दाखल केले गेले. (2019 मध्ये कमाल 49 लाख आयटीआर दाखल झाले होते) एकट्या जुलै 2022 मध्ये 5.13 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले आहेत.

    A new record of filing more than 72.42 lakh income tax returns on a single day, about 5.83 crore returns filed till 31st July 2022

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी