प्रतिनिधी
मुंबई : झारखंड मधल्या कट्टर नक्षलवाद्याला मुंबई – ठाणे पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथक एटीएसने नालासोपारा येथून रविवारी अटक केली आहे. झारखंड राज्यातील हजारीबाग येथे राहणाऱ्या कारू हुलाश यादव या नक्षलवाद्यावर तब्बल १५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता या नक्षलवाद्याला एटीएसने आपल्या ताब्यात घेतले आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामगिरीबद्दल एटीएस पथकाचे अभिनंदन केले आहे. A hardline Naxalite from Jharkhand arrested in Nalasopara
२००४ पासून नक्षली कारवायांमध्ये सक्रीय
कारू हुलाश यादव (४५) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. कारु यादव हा झारखंड राज्यातील हजारीबाग कटकम सांडी येथे राहणारा असून, केंद्र सरकारने बंदी घातलेल्या ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ (माओ) या संघटनेचा सदस्य आहे. २००४ पासून कारू यादव हा नक्षली कारवायांमध्ये सक्रीय असून सरकारने त्याला पकडून देण्यासाठी १५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मुंबई शहरापासून जवळच असलेल्या नालासोपारा येथे तो स्वतःवर औषधोपचार करण्यासाठी आला होता आणि नालासोपारा येथील धानवी, रामनगर या ठिकाणी तो लपून बसला होता.
तपासाला सुरुवात
कारू हा नक्षलवादी नालासोपारा येथे लपून बसला असल्याची माहिती ठाणे एटीएसला मिळताच दहशतवाद विरोधी पथकाने त्याला रविवारी सकाळी अटक केली आहे. त्याच्या अटकेची माहिती झारखंड पोलिसांना देण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती एटीएसने दिली आहे.
A hardline Naxalite from Jharkhand arrested in Nalasopara
महत्वाच्या बातम्या
- ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी : 16 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांत 608 ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
- चंदीगड विद्यापीठातील धक्कादायक प्रकार : 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल; 8 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न
- पुढच्या मराठवाडा मुक्तिदिनापूर्वी दौलताबाद किल्ल्याचे नाव ‘देवगिरी’ करणार , पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढांची घोषणा
- नॅशनल लॉजिस्टिक्स पॉलिसी अर्थात राष्ट्रीय रसद नीती जाहीर!; तिचे महत्त्व काय?