वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्याचे शिल्पकार नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती येत्या 23 जानेवारी रोजी आहे. या निमित्ताने इंडिया गेट परिसरात नेताजींच्या पूर्णाकृती पुतळा इंडिया गेट मध्ये उभारण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. A full-sized statue of Netaji will be erected at India Gate; Prime Minister Modi’s tweet
पंतप्रधान मोदींनी या संदर्भातले ट्विट करून तपशीलवार माहिती दिली आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा पुरता पुतळा ग्रॅनाईट मध्ये घडवण्यात येईल आणि तो इंडिया गेट मध्ये उभारण्यात येईल, असे त्यांनी ट्विट मध्ये स्पष्ट केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान अतुलनीय आहे.
संपूर्ण देश त्यांचा ऋणी आहे. त्यांच्या ऋणातून थोडेसे उतराई होण्यासाठी इंडिया गेट मध्ये सन्मानपूर्वक हा पुतळा उभारण्यात येईल, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. नेताजींचा पुतळा कसा असेल आणि तो कशा स्वरूपात उभारण्यात येईल याचे मानचित्र मोदींनी आपल्या ट्विटर हँडल वर शेअर केले आहे.
A full-sized statue of Netaji will be erected at India Gate; Prime Minister Modi’s tweet
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, महात्मा गांधींच्या हत्येवरील नव्या चित्रपटावरून वादंग, आव्हाडांकडूनच आक्षेप, तर इतरांनी केली सारवासारव
- एसटीचे यांत्रिक कर्मचारी होणार वाहक आणि चालक; एसटी महामंडळाचा निर्णय
- मोठी बातमी : कोरोना महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला फटका, IMFच्या मते 2024 पर्यंत उत्पादनात 12.5 ट्रिलियन डॉलरचे नुकसान
- नथुरामावरून ‘रामायण’ : नथ्थूचं उदात्तीकरण ही महाराष्ट्रात रुटीन बाब; पण मग…