• Download App
    दिल्लीत आम आदमी पार्टीला मोठा धक्का, जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश! A big blow to the Aam Aadmi Party in Delhi hundreds of workers including the district president joined the BJP

    दिल्लीत आम आदमी पार्टीला मोठा धक्का, जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश!

    दिल्लीत पुन्हा एकदा २६ एप्रिलला महापौरपदाची निवडणूक होणार आहे

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सुरू झालेल्या राजकीय लढाईत आम आदमी पार्टीला (आप) मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, खासदार मनोज तिवारी, पक्षाचे ज्येष्ठ नेते हरीश खुराना आदी नेते उपस्थित होते. A big blow to the Aam Aadmi Party in Delhi hundreds of workers including the district president joined the BJP

    वीरेंद्र सचदेवा यांनी आम आदमी पार्टीच्या नेत्यांचे भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्यांच्या हाती देत पक्षात स्वागत केले. यावेळी सचदेवा यांनी हेही सांगितले की, ‘’या सर्व नेत्यांना दिल्लीतील लोकांप्रमाणेच आपलीही आम आदमी पार्टीकडून फसवणूक झाल्याचे वाटत आहे. दिल्ली सरकार खोट्याच्या आधारावर सत्तेवर आले असून आज त्यांची भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. जोपर्यंत दिल्लीतून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढत राहील.’’

    यावेळी उपस्थित असलेले खासदार मनोज तिवारी यांनीही कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत केले आणि सांगितले की, आम आदमी पक्षाचा भ्रष्टाचार संपवतानाच  भारतीय जनता पार्टी दिल्लीवासीयांना जशी हवी आहे त्यासाठी काम करत राहील.

    महापौर निवडणुकीपूर्वी बदल –

    दिल्लीत पुन्हा एकदा २६ एप्रिलला महापौरपदाची निवडणूक होणार आहे. याआधी भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष हे प्रामुख्याने आमनेसामने आहेत. या दोन पक्षांमधील राजकीय लढाई दरम्यान, जिथे आम आदमी पक्ष आकडेवारीत खूप मजबूत स्थितीत दिसत आहे. दुसरीकडे भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवारानेही पूर्ण जोमाने निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे. अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात जाणारे शेकडो कार्यकर्ते आम आदमी पक्षासाठी धक्कादायक तर भाजपाचे मनोबल वाढणारे ठरणार आहेत.

    A big blow to the Aam Aadmi Party in Delhi hundreds of workers including the district president joined the BJP

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!