• Download App
    केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून महसुली तुट अनुदानापोटी 17 राज्यांना 9,871 कोटी रुपये|9,871 crore to 17 states from revenue deficit grants from the Union Finance Ministry

    केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून महसुली तुट अनुदानापोटी १७ राज्यांना ९,८७१ कोटी रुपये

    केंद्रीय अर्थ मंत्रालयाने महसुली तुटीच्या भरपाईसाठी मासिक हप्ता म्हणून राज्यांना ९८७१ कोटी रुपये दिले आहे.. पोस्ट डिव्होल्युशन रेव्हन्यू डेफिसिट (पीडीआरडी) अनुदानाअंतर्गत 17 राज्यांना 9,871 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. दुसरा हप्ता जारी केल्यामुळे चालू वित्तीय वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात राज्यांना एकूण 19,742 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत.9,871 crore to 17 states from revenue deficit grants from the Union Finance Ministry


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने महसुली तुटीच्या भरपाईसाठी मासिक हप्ता म्हणून राज्यांना ९८७१ कोटी रुपये दिले आहे.. पोस्ट डिव्होल्युशन रेव्हन्यू डेफिसिट (पीडीआरडी) अनुदानाअंतर्गत 17 राज्यांना 9,871 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत.

    दुसरा हप्ता जारी केल्यामुळे चालू वित्तीय वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात राज्यांना एकूण 19,742 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत.राज्य घटनेच्या कलम 275 अंतर्गत राज्यांना पोस्ट डिव्होल्युशन रेव्हन्यू डेफिसिट अनुदान केंद्र सरकार देते.



    राज्यांची महसुली तुट भरून काढण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार मासिक  अनुदान जारी केले जाते. आयोगाने 17 राज्यांसाठी अशा अनुदानाची शिफारस केली आहे.

    पंधराव्या वित्त आयोगाने, आंध्र प्रदेश, आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश,कर्नाटक , केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, त्रिपुरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांसाठी ही शिफारस केली आहे.

    हे अनुदान मिळण्याची राज्यांची पात्रता आणि अनुदानाचे प्रमाण हे राज्याचा महसूल आणि खर्चाचे यांच्यातील फरकांच्या आधारे आयोग ठरवते. 2021-22 या आर्थिक वषार्तील केलेल्या भरपाईची आयोगानेही दखल घेतली.

    पंधराव्या वित्त आयोगाने एकूण पोस्ट डेव्होल्यूशन महसूल तूट अनुदान म्हणून 17 राज्यांना एकूण 1,18,452 कोटी रुपये देण्याची शिफारस केली आहे.

    9,871 crore to 17 states from revenue deficit grants from the Union Finance Ministry

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!