वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पेटंटसाठी अर्ज करणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांच्या शिक्षण शुल्कात ८० टक्क्यांची कपात करण्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी केली. या मुळे देशी अथवा परदेशातील संस्थांना देखील या शुल्क कपातीचा लाभ मिळणार आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजकडून (सीआयआय) बौद्धिक संपदा विषयावर आयोजित एका वेबिनारमध्ये गोयल बोलत होते.80% reduction in tuition fees of all educational institutions applying for patents; Union Commerce and Industry Minister Piyush Goyal’s announcement
गोयल म्हणाले, सरकारच्या स्वामित्वाखाली असणाऱ्या मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांना यापूर्वी शैक्षणिक शुल्कात ८० टक्के सवलत होती. आता त्यात बदल केला आहे.
ते म्हणाले, ८० टक्के शुल्क सवलतीचा लाभ हा सर्व मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था, विद्यापीठं, शाळा आणि महाविद्यालयांना मिळेल. सरकारी वा सरकारच्या मदतीनं चालणाऱ्या खासगी संस्था. त्या देशात किंवा परदेशात असोत. त्यांना शुल्कात सवलत दिली जाईल.
प्रकाशन शुल्क आता ८५ हजार रुपयांवर
शैक्षणिक शुल्कातील सवलतीमुळे कोणत्याही संस्थेचं प्रकाशन शुल्क ४ लाख २४ हजार ५०० रुपयांवरून ८५ हजार रुपयांवर येईल. यामुळे विद्यापीठांना खूप मोठं प्रोत्साहन मिळेल. अनेक नवी विद्यापीठं आणि शैक्षणिक संस्था याचा लाभ घेतील, अशी मला आशा आहे, असं गोयल म्हणाले.
80% reduction in tuition fees of all educational institutions applying for patents; Union Commerce and Industry Minister Piyush Goyal’s announcement
महत्वाच्या बातम्या
- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या
- शबरीमला मंदिरात वडिलांसोबत दर्शनास जाण्याची अल्पवयीन मुलीला परवानगी
- मराठवाड्यात सर्वदूर बरसल्या श्रावणधारा, पावसामुळे पिकांना मिळाले जीवदान
- महाराष्ट्र ठरले एक कोटी जनतेला दोन्ही डोस देणारे देशातील पहिले राज्य
- राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल