• Download App
    देशभरात आतापर्यंत तब्बल ७४७ डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू , सर्वाधिक बळी तमिळनाडूत|747 doctors died due to corona

    देशभरात आतापर्यंत तब्बल ७४७ डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू , सर्वाधिक बळी तमिळनाडूत

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : कोरोनामुळे आजवर देशभरात ७४७ डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सर्वाधिक मृत्यू तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये झाले आहेत. महाराष्ट्रात ७४ खासगी डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे;747 doctors died due to corona

    तर शासकीय आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या तब्बल १०७ डॉक्टरांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.इंडियन मेडिकल असोसिएशनने कोव्हिडमुळे देशभरात मृत्युमुखी पडलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे.



    भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) यासंदर्भात देशभरातून माहिती गोळा केली. तमिळनाडूमध्ये सर्वाधिक म्हणजे ८९ डॉक्टर, पश्चिम बंगालमध्ये ८९, त्याखालोखाल महाराष्ट्रात ७४ खासगी डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

    असल्याची माहिती आयएमएने दिली आहे. महाराष्ट्राखालोखाल आंध्रात ७०, उत्तर प्रदेशमध्ये ६८; तर कर्नाटकात ६२ डॉक्टरांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

    महाराष्ट्रात आरोग्य विभागाच्या माहितीनुसार एकूण १७८ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा संसर्गाने मृत्यू झाला आहे. यामध्ये १०७ शासकीय; तर ७१ खासगी डॉक्टरांचा समावेश आहे. १०७ शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ४८ डॉक्टर; तर १० परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश. आहे.

    747 doctors died due to corona

    Related posts

    Narendra Modi, : अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत करणार ध्वजारोहण

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात