वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने सात नवीन बटालियन आणि भारत-चीन सीमेवर पहारा देणाऱ्या इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) चे प्रादेशिक मुख्यालय उभारण्यास मंजुरी दिली. यासोबतच 9400 नवीन पदेही निर्माण होणार आहेत. नवीन बटालियनसाठी अतिरिक्त सेक्टर हेडक्वार्टरदेखील तयार केले जाईल.7 new battalions of ITBP deployed on China border to be created Decision of the Union Cabinet
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीबाबत माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षा मंत्रिमंडळ समितीच्या (CCS) बैठकीत याला मंजुरी देण्यात आली.
47 नवीन बॉर्डर आउट पोस्ट्स आणि 12 स्ट्रॅटेजिक कॅम्प्सचे काम प्रगतिपथावर
ठाकूर म्हणाले की, भारत-चीन सीमेवर लक्ष ठेवणारी ITBP सध्या 176 सीमा चौक्यांवर नजर ठेवत आहे. चीनसोबतच्या लांब सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी अधिक सुरक्षा दल, बॉर्डर आउट पोस्टची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ते 2025-26 पर्यंत पूर्ण होईल.
याशिवाय, सरकारने जानेवारी 2020 मध्येच 47 नवीन बॉर्डर आउट पोस्ट (BOP) आणि 12 रणनीतिक शिबिरे स्थापन करण्याच्या ITBP च्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यांचे काम वेगाने सुरू आहे. त्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त बळासाठी सात नवीन बटालियन तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यावर्षीही आपल्या सैन्याची चिनी सैनिकांशी चकमक झाली होती. केंद्राच्या निर्णयामुळे चीनशी असलेल्या सीमेवर सुरक्षेत वाढ होणार आहे.
7 new battalions of ITBP deployed on China border to be created Decision of the Union Cabinet
महत्वाच्या बातम्या
- टीव्ही डिबेटमध्येच दे दणादण : सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि राजू दास भिडले, प्रभु रामचंद्राचा केला होता अवमान
- महागाईच्या पातळीवर लवकरच मिळेल दिलासा : अर्थमंत्री म्हणाल्या- पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, टॅक्स होणार कमी
- जयंत पाटलांच्या मतदारसंघात भावी मुख्यमंत्र्यांची पोस्टर्स!!; दोघात तिसरा की राष्ट्रवादीचा डार्क हॉर्स??
- शरद पवार आणि संजय राऊत हे आता फाटक्या आणि जीर्ण नोटा; गोपीचंद पडळकरांचे शरसंधान