प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील महत्त्वाची मीडिया कंपनी एनडीटीव्ही मध्ये गौतम अदानी यांची कंपनी एएमजी हिची 65 % हिस्सेदारी होणार आहे. सकारात्मक आणि खुल्या चर्चेनंतर प्रणव रॉय आणि राधिका रॉय हे दांपत्य एनडीटीव्ही मधले आपले शेअर्स अदानींना विकणारा असून त्यामुळे अदानींची एएमजी मीडिया लिमिटेड ही कंपनी एनडीटीव्हीची संपूर्ण मालकी असणारी कंपनी ठरणार आहे. 65% stake of Gautam Adani’s company AMG in NDTV
गौतम अदानी यांच्या समवेत अतिशय सकारात्मक आणि खुल्या वातावरणात चर्चा झाल्याचे पत्रक प्रणव रॉय आणि राधिका रॉय या दांपत्याने काढले आहे. एनडीटीव्ही हा देशातला विश्वासार्ह बातम्यांचा मीडिया ब्रँड आहे. त्यातले आमच्या वाट्याचे शेअर्स गौतम अदानी यांना विकण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.
गौतम अदानी यांच्या समावेत सकारात्मक आणि खुल्या वातावरणात चर्चा झाली. आम्ही केलेल्या सर्व सूचनांना गौतम आदानी यांनी मान्यता दिली आहे. गौतम अदानी यांची एएमजी ही कंपनी आता एनडीटीव्हीची मालक असणार आहे. भविष्यात ही कंपनी आपली विश्वासार्हता जपून माध्यम क्षेत्रात आपला ठसा कायमचा टिकवेल, असा विश्वास रॉय दंपत्याने या पत्रकात व्यक्त केला आहे.
एनडीटीव्हीचा अँकर रवीश कुमार याने काही मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला आवाज बंद करण्यासाठी एनडीटीव्ही गौतम अदानी यांना विकत घ्यायला लावला, असा आरोप नुकताच केला आहे. या पार्श्वभूमीवर गौतम अदानी यांच्याबरोबर सकारात्मक आणि खुल्या वातावरणात चर्चा झाल्याचे पत्रक एनडीटीव्हीचे आधीचे प्रमोटर्स प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी काढल्याने रवीश कुमार याच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
65% stake of Gautam Adani’s company AMG in NDTV
महत्वाच्या बातम्या
- मोदी नव्हे, अदानी – अंबानींचे सरकार!; माँ बेटे की सरकारच्या टीकेला 8.5 वर्षांनी प्रत्युत्तर
- 81.35 कोटी जनतेला वर्षभर मोफत धान्य; मोदी सरकारचा मोठा निर्णय
- भगूरमध्ये सावरकर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांची 100 कोटींची मागणी
- स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी; १४३८ रिक्त जागांसाठी भरती