mizoram assam border dispute : आसाम आणि मिझोरामदरम्यान सीमावाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दोन्ही राज्यांच्या सीमेवर आसामच्या सुरक्षा दलातील आणि मिझोरममधील नागरिकांमध्ये चकमक उडाली आहे. एवढेच नव्हे, तर या चकमकीत आसाम पोलिसांचे सहा जवान शहीद झाले आहेत. या घटनेनंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात पीएमओच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. त्याचबरोबर सूत्रांच्या माहितीनुसार, आसाम-मिझोराम सीमेवर सीआरपीएफ तैनात झाल्यानंतर परिस्थिती काहीशी शांत झाली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आसाम आणि मिझोरामदरम्यान सीमावाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दोन्ही राज्यांच्या सीमेवर आसामच्या सुरक्षा दलातील आणि मिझोरममधील नागरिकांमध्ये चकमक उडाली आहे. एवढेच नव्हे, तर या चकमकीत आसाम पोलिसांचे सहा जवान शहीद झाले आहेत. या घटनेनंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात पीएमओच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. त्याचबरोबर सूत्रांच्या माहितीनुसार, आसाम-मिझोराम सीमेवर सीआरपीएफ तैनात झाल्यानंतर परिस्थिती काहीशी शांत झाली आहे.
याबाबत माहिती देताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आसाम-मिझोराम सीमेवरील आमच्या राज्याच्या घटनात्मक हद्दीचे रक्षण करताना आसाम पोलिसांच्या सहा शूर सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिल्याची माहिती देऊन मला फार वाईट वाटत आहे. सर्व शोकग्रस्त कुटुंबांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो.
यापूर्वी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले होते. सोमवारी संध्याकाळी गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी दोन्ही राज्यांना हा वाद मिटवण्यास सांगितले. ज्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा वाद मिटवून लवकरच प्रकरण शांत करण्याचे आश्वासन गृहमंत्र्यांना दिले आहे.
सोमवारी मिझोरामचे सीएम झोरमथांगा यांनी गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान कार्यालयाला टॅग करत पोलिस आणि नागरिकांमधील चकमकींचा व्हिडिओ ट्विट करून या प्रकरणावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आणखी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यात कारचा काच तुटलेला दिसतो. त्यांनी व्हिडिओसह लिहिले, “मिझोरामला परतणाऱ्या निष्पाप नागरिकांवर गुंडगिरी करण्यात आली आहे. अशा हिंसक घटनांना तुम्ही कसा न्याय द्याल?”
त्याचबरोबर आसाम पोलिसांनीही एक ट्विट केले आहे. आसाम पोलिसांनी सांगितले की, मिझोराममधील काही असामाजिक घटक आसामच्या सरकारी अधिकाऱ्यांवर दगडफेक करत आहेत, हे दुर्दैव आहे. हे अधिकारी आसामची भूमि अतिक्रमणापासून वाचविण्यासाठी लैलापुरात तैनात आहेत.
आसामचे सीएम हिमंता बिस्वा सर्मा यांनी ट्विटरवर लिहिले, आदरणीय झोरमथंगा जी, कोलासिब (मिझोराम) चे एसपी यांनी आम्हाला सांगितले आहे की, जोपर्यंत आम्ही आमच्या जागेवरून मागे हटत नाही, त्यांचे नागरिक ऐकणार नाहीत आणि हिंसाचार थांबवणार नाहीत. अशा परिस्थितीत सरकार कसे चालू शकेल? ‘ यानंतर अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाला टॅग करत त्यांनी लिहिले की, ‘आशा आहे की आपण लवकरात लवकर हस्तक्षेप कराल.’
या ट्वीटला उत्तर देताना झोरमथंगा यांनी ट्विट केले की, ‘हिमंता जी, मा. शहा जी यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांची सौहार्दपूर्ण बैठक आयोजित केली. त्यानंतर आश्चर्यकारकरीत्या आज आसाम पोलिसांच्या दोन कंपन्या मिझोराममधील व्हेरिंग्टो रिक्षा स्टँडजवळ आल्या आणि त्यांनी अश्रूधुराचे गोळे फेकले व तेथील नागरिकांवर लाठीचार्ज केला. त्यांनी सीआरपीएफ आणि मिझोराम पोलिस कर्मचार्यांना पळवून लावले.
हिमंता बिस्वा सरमा यांनी आणखी एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले की, मी सीएम झोरमथंगा यांच्याशी बोललो आहे. मी पुनरुच्चार केला आहे की, मी आसाम सीमेवरील स्थिती कायम राखेल. जेणेकरून शांतता कायम राहील. त्यांनी मिळून प्रश्न सोडवण्यावरही भाष्य केले. अमित शहा यांनी शिलॉंगमध्ये ईशान्येकडील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दोन दिवसांपूर्वीच भेट घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- कुरापतखोर चीनसमोर भारतीय सैन्य दलाने उभे केले तोडीस तोड आव्हान; राफेलपासून विविध क्षमतेच्या मिसाईलची सीमेवर तैनाती
- तेलंगणच्या या मंदिराचा यूनेस्कोने जागतिक वारसा स्थळांत केला समावेश, पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून दिल्या शुभेच्छा
- औरंगाबादेत शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांची भाजपच्या गोविंद केंद्रेंना जबर मारहाण, मंत्री भुमरेंच्या कार्यालयात घडला प्रकार
- सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी मुंबईतल्या तरुणाने टाकला रेल्वेखाली आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांनी केली अटक
- मोठी बातमी : मीराबाईचे मेडल गोल्डमध्ये बदलण्याची शक्यता, वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या चिनी खेळाडूवर डोपिंगचा संशय, चाचणी होणार