वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सीएए विरोधातील आंदोलनात चर्चेत आलेली शाहीनबाग आता ड्रग्स माफियांचा अड्डा असल्याचे स्पष्ट झाले आहे. 50 kg drugs worth Rs 400 crore seized from Shaheen Bagh; 30 lakh cash found
११ डिसेंबर २०१९ ते २४ मार्च २०२० या कालावधीत दिल्लीतील मुस्लिम समाजातील शेकडो कुटुंबांनी शाहीन बाग रस्त्यावर बेमुदत ठिय्या मांडला होता. सीएए कायद्याच्या विरोधात मुस्लिमांनी हे आंदोलन केले होते. केंद्र सरकारला अडचणीत आणण्यासाठी या भागाचा राजकीय वापर केला, आज तोच भाग पुन्हा चर्चेत आला आहे. या ठिकाणी 50 किलो ड्रग्ज आणि 30 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
या भागातून नोटा मोजण्याची मशीनदेखील हस्तगत करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत सुमारे 400 कोटी रुपये इतकी आहे. एनसीबीने ही कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेले ड्रग्ज अफगाणिस्तानातून आणण्यात आले होते. इंडो-अफगाण सिंडिकेटच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री सुरू होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. अफगाणिस्तानातून आणण्यात आलेले हेरॉईन फ्लिपकार्टच्या पॅकिंगमध्ये बंद होते.
अफगाणिस्तान पाकिस्तानात धागेदोरे
या सिंडिकेटचे धागेदोरे उत्तर प्रदेश, पंजाबपर्यंत जात असल्याचे समजते. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. दिल्लीतील शाहीन बाग आणि जामिया परिसरात छापे टाकण्यात आले. ड्रग्ज तस्करीच्या एका मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यात एनसीबीला यश आले. या सिंडिकेटमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतीय व्यक्तींचा समावेश आहे.
50 kg drugs worth Rs 400 crore seized from Shaheen Bagh; 30 lakh cash found
महत्त्वाच्या बातम्या
- Nawab Malik : 5000 पानी आरोपपत्र, सुप्रीम कोर्टाच्या झटक्यानंतर आता तब्येतीचे कारण दाखवत मलिकांचा पुन्हा जामीन अर्ज!!
- एसटी बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने बसची वाहनांना धडक
- Petrol Diesel Hike : सत्य टोचते, पण आकडे बोलतातच; हरदीपसिंग पुरींनी ठाकरे – पवार सरकारला सुनावले!!
- सभांचा धडाका : 1 मे संभाजीनगरात राजसभेच्या दिवशीच मुंबईत फडणवीस “बूस्टर डोस” सभा!!