विशेष प्रतिनिधी
मुंबई – मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, गुरुग्राम, हैदराबाद, अहमदाबाद या शहरात प्रथम फाईव्ह जी सेवा सुरु करण्यास दूरसंचार विभागाने संमती दिली आहे. पुढील वर्षाच्या मध्यास ही सेवा सुरु होण्याचा अंदाज आहे. ज्या शहरांमध्ये फाईव्ह जी सेवेच्या चाचण्या सुरु आहेत तिथे ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरु होईल.5 G service will begin in 5 cities
भारती एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया (व्ही) या कंपन्यांतर्फे चंदीगड, जामनगर, चेन्नई, लखनौ, गांधीनगर या शहरांमध्ये या सेवेच्या चाचण्या सुरु आहेत. विभागातर्फे पुढीलवर्षात एप्रिलपर्यंत फाईव्ह जी स्पेक्ट्रमचा लिलाव केला जाईल अशी शक्यता आहे.
यासंदर्भात टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटीच्या (ट्राय) शिफारशींची प्रतीक्षा विभागाला आहे. ट्रायने यापूर्वीच यासंदर्भातील फाईव्हजीच्या किंमती, लिलावातील मुद्दे इ. बाबत कंपन्यांकडून सूचना मागविल्या आहेत.
महानगरांमध्ये फाईव्ह जी स्पेक्ट्रम मिळविण्यासाठी या कंपन्यांना अंदाजे सत्तर हजार कोटी रुपये मोजावे लागतील, असे बोलले जात आहे. तर या उद्योगावरील कर्जदेखील यावर्षीच्या मार्च अखेरीस चार लाखकोटींवर गेले आहे.
दूरसंचार विभागाकडील आकडेवारीनुसार देशात मार्च २०१४ मध्ये २५ कोटी इंटरनेट जोडण्या होत्या. ती संख्या यावर्षीच्या जूनमध्ये ८३ कोटींवर गेली आहे. तर याच कालावधीतील ब्रॉडबँड कनेक्शनमध्ये तब्बल १२ पट वाढ (सहा कोटींवरून ७९ कोटी) झाली.
5 G service will begin in 5 cities
महत्त्वाच्या बातम्या
- राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचा संसर्ग वाढला, 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट
- आर्थिक दुर्बल घटकांसाठी आठ लाख उत्पन्नाची मर्यादाच कायम
- धर्मसंसदेतील आक्षेपार्ह वक्तव्य, कालीचरण महाराज यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला
- भारतातील सर्वात उंचीवर असलेल्या घुम रेल्वे स्टेशनमध्ये बर्फवृष्टी! पर्यटकांनी घेतला आनंद