• Download App
    तेलगू देशमला मतासाठी पाच कोटींची लाच, तेलंगणातील वोटच्या बदल्यात नोट प्रकरणात आरोपपत्र दाखल|5 crore bribe from Telugu Desam for votes, chargesheet filed in Telangana vote exchange case

    तेलगू देशमला मतासाठी पाच कोटींची लाच, तेलंगणातील वोटच्या बदल्यात नोट प्रकरणात आरोपपत्र दाखल

    विधान परिषदेसाठी मतदानात तेलगू देशम पक्षाला मतदान करावे यासाठी पन्नास लाख रुपये रोख लाच आणि आणखी पाच कोटी रुपये देण्याचे आमिष दाखविणाºया तेलंगणातील नोटके बदले वोट प्रकरणात तेलंगणा राष्ट्र समितीच्या खासदारासह एका आमदारावर सक्तवसुली संचालनालयाने आरोपपत्र दाखल केले आहे. २०१५ मधील हे प्रकरण आहे.5 crore bribe from Telugu Desam for votes, chargesheet filed in Telangana vote exchange case


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : विधान परिषदेसाठी मतदानात तेलगू देशम पक्षाला मतदान करावे यासाठी पन्नास लाख रुपये रोख लाच आणि आणखी पाच कोटी रुपये देण्याचे आमिष दाखविणाऱ्या तेलंगणातील नोटके बदले वोट प्रकरणात

    तेलंगणा राष्ट्र समितीच्या खासदारासह एका आमदारावर सक्तवसुली संचालनालयाने आरोपपत्र दाखल केले आहे. २०१५ मधील हे प्रकरण आहे.
    तेलंगणा विधानसभेतील आंग्ल-भारतीय समुदायाचे प्रतिनिधीत्व करणारे स्वीकृत आमदार एल्विस स्टिफनसन यांना ५० लाख रुपये रोख लाच दिली होती.



    त्यांनी विधान परिषदेच्या मतदानापासून दूर रहावे किंवा तेदेपा उमेदवार वेम नरेंद्र रेड्डी यांच्या बाजूने मतदान करावे, यासाठी ही लाच होती. १ जून २०१५ रोजी मतदान होणार होते. ईडीच्या तपासात पुढे आले की, रेड्डी, वीरैया व इतरांनी एल्विस यांना लाच देण्याचा कट रचला होता.

    आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला व त्यांना पाच कोटी रुपये लाच देण्याची तयारी दर्शविली. विशेष म्हणजे याबाबत एल्विस यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा रचण्यात आला व आरोपींशी त्यांची झालेली चर्चा गोपनीयरित्या रेकॉर्ड करण्यात आली.

    अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तेलंगणा काँगेसचे खासदार ए. रेवंत रेड्डी, तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) आमदार व्यंकट वीरैयासह काही जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने म्हटले आहे की,

    २०१५ मधील या प्रकरणात हैदराबादमधील नामपल्लीमध्ये पीएमएलए कायद्यांतर्गत विशेष न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले. मलकाजगिरीचे काँग्रेस खासदार अनुमुला रेवंत रेड्डी,

    सथुपल्लीचे आमदार एस. व्यंकट वीरैया, बिशप हॅरी सेपेस्टियन, रुद्र शिवकुमार उदय सिम्हा, मथैया जेरूसलेम व वेम कृष्ण कीर्तन यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    रेड्डी व वीरैया यापूर्वी तेलगू देसम पार्टीमध्ये (तेदेपा) होते. सध्या रेड्डी हे काँग्रेस व वीरैया हे टीआरएसमध्ये आहेत. आरोपींनी हा गुन्हा केला व पीएमएलए अंतर्गत गुन्हा असलेले मनी लाँड्रिंग केली, असे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आरोपींवर तक्रार दाखल केल्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी सुरू करावी, अशी विनंती केली आहे.

    5 crore bribe from Telugu Desam for votes, chargesheet filed in Telangana vote exchange case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य