Ram Setu : बॉलीवूडचा खिलाडी दिग्गज अभिनेता अक्षय कुमारने रविवारीच त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. आता त्याच्या आगामी चित्रपट ‘रामसेतू’च्या सेटवरील 45 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. सर्व सध्या क्वारंटाइन आहेत. सेटवर एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चित्रपटाच्या शूटिंगला आता विलंब होणार हे निश्चित आहे. 45 junior artists on set of ‘Ram Setu’ infected with corona, shooting of Akshay’s film delayed
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूडचा खिलाडी दिग्गज अभिनेता अक्षय कुमारने रविवारीच त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. आता त्याच्या आगामी चित्रपट ‘रामसेतू’च्या सेटवरील 45 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. सर्व सध्या क्वारंटाइन आहेत. सेटवर एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चित्रपटाच्या शूटिंगला आता विलंब होणार हे निश्चित आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, सोमवारी 5 एप्रिल रोजी 100 जण ‘रामसेतू’च्या सेटवर काम सुरू करणार होते. हे सर्वजण मड आयलंडमध्ये चित्रपटाच्या सेटवर जाणार होते. जाण्यापूर्वी 45 ज्युनियर आर्टिस्टची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आणि यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूईसी) चे सरचिटणीस अशोक दुबे म्हणाले की, राम सेतूची टीम पूर्ण काळजी घेत आहे. हे दुर्दैव आहे की, ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशनचे 45 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ते सर्व क्वारंटाइनमध्ये आहेत.
शूटिंग 14 पुढे ढकलली
अक्षयसह 45 ज्युनियर आर्टिस्टना कोरोनाची लागण झाल्यानंतर सोमवारी चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, आता चित्रपटाचे शूटिंग 14 दिवसांनंतरच सुरू होईल. अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह होण्यापूर्वी मड आयलंडवरच राम सेतूचे शूटिंग करत होता. त्याला चाचणीपूर्वी कोणतीही लक्षणे नव्हती आणि तो तंदुरुस्त दिसून येत होता.
कोरोना टाळण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च
सूत्रांनी असेही सांगितले आहे की, ‘खबरदारी म्हणून शूटिंग करण्याच्या काही दिवस आधी कोरोनाची चाचणी घेण्यात आली. ज्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, परंतु राम सेतूचे निर्माते त्यांना पैसेही देत आहेत. चित्रपटाचे युनिट एवढे सावध आहे की, जर एखाद्या व्यक्तीची तब्येत ठीक नसेल तर त्यांना युनिटने केलेल्या व्यवस्थेत वेगळे ठेवले जात आहे. राम सेतूच्या सेटवर पीपीई किट मोठ्या संख्येने आढळतील. राम सेतूच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून कोरोनाच्या चाचण्या आणि वेगवेगळ्या कामांवर एक लाखाहून अधिक रुपये खर्च झाले आहेत.
45 junior artists on set of ‘Ram Setu’ infected with corona, shooting of Akshay’s film delayed
महत्त्वाच्या बातम्या
- Who Is Naxal Commander Hidma : कोण आहे चकमकीचा मास्टरमाइंड कुख्यात नक्षली हिडमा, जाणून घ्या…
- कोरोना संसर्गाने मोडले सर्व रेकॉर्ड, पहिल्यांदाच 24 तासांत 1 लाखांहून अधिक रुग्ण, 12 राज्यांत सर्वाधिक
- पंजाबात केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यावर कथित शेतकऱ्यांचा जीवघेणा हल्ला, अमरिंदरसिंग सरकारचे पोलीस बनले मूकदर्शक
- फेसबुक वापरताय, सावधान?, तुमच्या माहितीवर हॅकर्सकडून डल्ला मारण्याचा वाढता धोका
- कॉंग्रेसचे नेते सुधाकर यांच्या खात्यातून त्या युवतीला पैसे?, जारकीहोळी प्रकरणाला गंभीर राजकीय वळण