विशेष प्रतिनिधी
गुजरात : इंडियन कोस्टल गार्ड आणि गुजरात अँटी टेररिस्ट स्क्वाड यांनी एकत्रित केलेल्या ऑपरेशनद्वारे गुजरातमधून एका पाकिस्तानी बोटला ताब्यात घेण्यात आले आहे. या बोटमध्ये 77kg हेरॉइन ज्याची किंमत 400 करोड रुपये आहे, हे पकडण्यात आले आहे. या बोट मधील सर्व 6 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.
400 crore drugs seized from Gujarat, Sanjay Raut comments Gujarat’s responsibility should be given to famous NCB officials
‘अल हुसैनी’ नावाच्या पाकिस्तानी बोटला भारतीय जल सीमारेषेच्या आत पकडण्यात आले आहे. अशी माहिती गुजरात डिफेन्स पीआरओ यांनी दिली आहे. चौकशीसाठी ही बोट पुन्हा जखाऊ बंदराच्या येथे आणण्यात आली आहे.
ही बोट पाकिस्तानमधील कराची बंदरातून निघाली होती. हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ चॅनलद्वारे हे लोक संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. हरी 1, हरी 2 असे कोडवर्डमध्ये ते बोलत होते.
हाजी हसन आणि हाजी हसम या दोन पाकिस्तानी स्मगलर्सनी हे सापडलेले हेरॉइन या बोटमधून पाठवले असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये आढळून आले आहे.
याप्रकरणा नंतर संजय राऊत यांनी म्हणाले की, आर्यन खानला पकडणे, नवाब मलिक यांच्या जावयाला खोट्या गुन्ह्यामध्ये पकडणे. जे एनसीबीचे गाजलेले अधिकारी आहेत यांना गुजरातची जबाबदारी दिली पाहिजे. असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.
गुजरात हे अमली पदार्थाच्या वाहतुकीचे मोठे पोर्ट झाले आहे असे दिसत आहे. आणि ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. संपूर्ण देशाला एखाद्या नशेत गुंग करण्यासाठी गुजरातच्या भूमीचा वापर होतो यासाठी पंतप्रधानांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.
400 crore drugs seized from Gujarat, Sanjay Raut comments Gujarat’s responsibility should be given to famous NCB officials
महत्त्वाच्या बातम्या
- Election : राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींसाठी मतदान सुरू, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, वाचा सविस्तर
- पंजाबमध्ये विरोधकांचा भाजपमध्ये जंबो प्रवेश; वीस माजी मंत्री, खासदारासह आमदारांचा प्रवेश
- पुणे : महापालिकेच्या तब्बल १८ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले ; वेतनाची बिले तयार करण्यासाठी २० अतिरिक्त कर्मचारी नियुक्त
- IMPORTANT NEWS : म्हाडाची ऑनलाईन परीक्षा फेब्रुवारीत होणार ;वाचा सविस्तर