• Download App
    भारत कि महान विभूतियाँ' मध्ये ४ महाराष्ट्रीय महापुरुष ; हरियाणातील मराठी माणसाचा पाठपुरावा फलद्रूप। 4 Maharashtrian greats in 'Bharat Ki Mahan Vibhutiyan' ; The pursuit of a Marathi man in Haryana is fruitful

    भारत कि महान विभूतियाँ’ मध्ये ४ महाराष्ट्रीय महापुरुष ; हरियाणातील मराठी माणसाचा पाठपुरावा फलद्रूप

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च एण्ड ट्रेनिंग’ किंवा ‘राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद्’, थोडक्यात ‘एनसीईआरटी’ या संस्थेने भारतातील ७ महनीय व्यक्तींचा समावेश आपल्या ‘भारत कि महान विभूतियाँ’ या ‘यू-ट्यूब’ चॅनेल मध्ये केला आहे. हरियाणातील एका मराठी भाषकाने यासाठी पंतप्रधान ते भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद असा अथक पाठपुरावा केला. 4 Maharashtrian greats in ‘Bharat Ki Mahan Vibhutiyan’ ; The pursuit of a Marathi man in Haryana is fruitful

    आदि शंकराचार्य , छत्रपती शिवाजी महाराज,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, डॉ. केशव बळीराम हेडगेवार, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी , पं. दीनदयाळ उपाध्याय यांचा NCERT द्वारे, ‘भारत कि महान विभूतियाँ’ (Bharat Ki Mahan Vibhootiyan) या शृंखलेत करण्यात आला आहे.

    ‘भारत कि महान विभूतियाँ’ या ‘यू-ट्यूब’ चॅनेल मध्ये महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाष चंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, कवी कलश, काही वैज्ञानिक अशा कैक व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. १०-१५ मिनिटांचे माहितीपट, केवळ ध्वनी-स्वरूपात असले तरी विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. त्यातून अगदी त्या व्यक्तीच्या कर्तृत्वासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोचते.

    मात्र अधिक शोध घेता, या माहितीपटांमध्ये काही महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश राहून गेला आहे, असे हरियाणा येथील गुरुग्राममध्ये राहणारे मराठी भाषक कार्यकर्ते जीवन तळेगावकर (Jeevan Talegaonkar) यांच्या लक्षात आले.

    खात्री करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या https://pgportal.gov.in/ या संकेतस्थळावर १३ नोव्हेंबर २०१९ रोजी तक्रार नोंदवली आणि अधिक माहिती मागवली.

    त्यासंबंधी तळेगावकर यांना पंतप्रधान कार्यालय, PMO आणि NCERT च्या वतीने १५ जानेवारी २०२० रोजी कळवण्यात आले की, ज्या व्यक्तिचरित्रांची चौकशी केली आहे, त्यांच्यावरील माहितीपट कधीच बनविण्यात आले नाहीत. यात आदि शंकराचार्य , छत्रपती शिवाजी महाराज,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, डॉ. केशव बळीराम हेडगेवार, 6. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी , पं. दीनदयाळ उपाध्याय महनीय व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख होता.

    या व्यक्तींवर माहितीपट बनावेत आणि इतरही राहिलेल्या विभूतींचा, जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, या शृंखलेत समावेश व्हावा यासाठी तळेगावकर यांनी कैक वेळा NCERT सोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण अपेक्षित उत्तर मिळाले नाही.

    मग, राज्यसभा सदस्य ‘भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदे’चे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे (Dr. Vinay Sahasrabuddhe )यांना निवेदन दिले. त्यांच्या प्रयत्नांचे फलित म्हणून वरील व्यक्तिमत्त्वांचा समावेश आता, ‘भारत कि महान विभूतियाँ’मध्ये करण्यात आला आहे.

    https://www.youtube.com/playlist?list=PLUgLcpnv1Yie9SuagnAAe9bhpIY-5-ArH या
    संकेतस्थळावर हे व इतर माहितीपट आता विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहेत.

    4 Maharashtrian greats in ‘Bharat Ki Mahan Vibhutiyan’ ; The pursuit of a Marathi man in Haryana is fruitful

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य