प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मध्य प्रदेशात बांधण्यात आलेल्या घरांमध्ये आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर लाभार्थी गृहप्रवेश करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत सतना जिल्ह्यातील 4.50 लाख लाभार्थ्यांना ही गृहप्रवेशाची संधी मिळणार आहे. 4.50 lakh beneficiaries in Madhya Pradesh today on Dhantrayodashi
त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीच्या मुहूर्तावर देशातील 75 हजार तरुणांना सरकारी नोकरीचे गिफ्ट देणार आहे. आज 22 ऑक्टोबर 2022 रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी शनिवारी पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देशातील तरुणांशी संपर्क साधणार असून 75000 तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे देणार आहेत.
डिसेंबरपर्यंत 10 लाख नोकऱ्या देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या जून महिन्यात सांगितले होते की, देशातील तरुणांना आगामी डिसेंबरपर्यंत 10 लाख नोकऱ्या दिल्या जातील. त्यानुसार आज 22 ऑक्टोबर रोजी 75000 तरुणांना संरक्षण, रेल्वे, पोस्ट, गृह मंत्रालय, सीआयएसएफ, श्रम आणि रोजगार, सीबीआय, सीमाशुल्क विभाग, बँका, सीएएफ इत्यादी विविध मंत्रालयांमध्ये या नोकऱ्या दिल्या जातील.
देशातील विविध शहरात होणाऱ्या कार्यक्रमात अनेक केंद्रीय मंत्रीही सहभागी होणार आहेत. यासोबतच खासदार त्यांच्या लोकसभा मतदारसंघातून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान ओरिसातून, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया गुजरातमधून, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर चंदीगडमधून, वाणिज्य मंत्री पियुष गोयल महाराष्ट्रातून सहभागी होणार आहेत. राजस्थानमधून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, तामिळनाडूतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन, उत्तर प्रदेशातून अवजड उद्योगमंत्री महेंद्रनाथ पांडे, झारखंडमधून अर्जुन मुंडा, बिहारमधून गिरीराज सिंह सहभागी होणार आहेत.
धनत्रयोदशी 4.50 लाख लाभार्थ्यांचा गृहप्रवेश
याशिवाय धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी 4.50 लाख लाभार्थ्यांच्या गृहप्रवेशात आभासी पद्धतीने सहभागी होतील. मध्य प्रदेशात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तब्बल 35 हजार कोटी रुपये खर्च करून 29 लाख घरे बांधण्यात आली आहेत. यातील सतना जिल्ह्यातील 4.50 लाख लाभार्थ्यांचा गृहप्रवेश आज होत आहे.
4.50 lakh beneficiaries in Madhya Pradesh today on Dhantrayodashi
महत्वाच्या बातम्या
- हिंदू दहशतवाद ते श्रीमद्भगवद्गीतेत जिहाद; काँग्रेसी घसरत्या मानसिकतेचा उन्माद
- रमा एकादशीच्या दिवशी पंतप्रधान मोदींचे श्री केदारनाथ दर्शन; पाहा क्षणचित्रे
- ऐन दिवाळीत केंद्र सरकारने डाळींचे दर घटवले; कांद्याचा बफर स्टॉक केला खुला
- फ्रान्सच्या किनाऱ्यावर सावरकरांचा पुतळा उभारणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा