देशात कोरोनाचा संसर्ग भयावह बनत चालला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तीन लाखांहून अधिक रुग्ण पुढे येत आहेत. गेल्या २४ तासांत ३.४७ (३,४७,२५४) लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या गुरुवारपेक्षा २९,७२२ ने अधिक आहे. यानंतर देशातील बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 3.47 lakh corona Casese in a day More than 20 lakh corona patients are being treated in the country
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग भयावह बनत चालला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तीन लाखांहून अधिक रुग्ण पुढे येत आहेत. गेल्या २४ तासांत ३.४७ (३,४७,२५४) लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या गुरुवारपेक्षा २९,७२२ ने अधिक आहे. यानंतर देशातील बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
सध्या 20,18,825 रुग्ण कोरोना संसर्गावर उपचार घेत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील कोरोनामधून बरे होणाऱ्या लोकांचे दररोजचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. आता ते 93.50 टक्क्यांवर पोहोचले आहे.
संसर्गाचा दर 17 टक्क्यांच्या वर
देशात कोरोनाच्या संसर्गाच्या दरातही वाढ झाली आहे. दोन दिवसांत तीन लाख रुग्ण आढळल्यानंतर संसर्ग दर 17.94 टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत २,५१,७७७ लोक बरे झाले आणि घरी परतले.
देशात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे 703 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एका दिवसापूर्वी ही संख्या ४९१ होती.
कोरोनासोबतच ओमिक्रॉनचा संसर्गही वेगाने पसरत आहे. आता देशातील एकूण ९६९२ लोकांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. कालच्या तुलनेत आज ही संख्या ४.३६ टक्क्यांनी अधिक आहे.