2nd Anniversary Of Article 370 revoke : जम्मू -काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी म्हटले की, श्रीनगरमधील बहुतेक दुकाने बंद आहेत आणि परिस्थिती शांत आहे. दुसरीकडे, भाजपने केंद्रशासित प्रदेशात तिरंगा रॅली काढून आणि राष्ट्रध्वज फडकावून साजरा केला. पीडीपीने कलम 370 रद्द करण्याच्या विरोधात मोर्चा काढला. 2nd Anniversary Of Article 370 revoke bjp hoists tricolor across jammu kashmir so pdp says day of mourning
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू -काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी म्हटले की, श्रीनगरमधील बहुतेक दुकाने बंद आहेत आणि परिस्थिती शांत आहे. दुसरीकडे, भाजपने केंद्रशासित प्रदेशात तिरंगा रॅली काढून आणि राष्ट्रध्वज फडकावून साजरा केला. पीडीपीने कलम 370 रद्द करण्याच्या विरोधात मोर्चा काढला.
पीडीपीचा निषेधाचा मोर्चा
जम्मू -काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्याच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी गुपकर आघाडीची (पीएजीडी) बैठक झाली. या बैठकीला आघाडीच्या उपाध्यक्षा आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती, प्रवक्ते आणि माकप नेते एमवाय तारिगामी आणि अवामी नॅशनल कॉन्फरन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुझफ्फर शाह उपस्थित होते. पीएजीडी ही जम्मू -काश्मीरमधील विविध मुख्य प्रवाहातील पक्षांची युती आहे. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी गुरुवारी सांगितले की, जेव्हा लोकांवर “घोर अन्याय” केला जात होता, तेव्हा त्यांच्याकडे “जगण्यासाठी प्रतिकार” करण्याशिवाय पर्याय नव्हता.
श्रीनगरमध्ये, काळ्या पट्ट्या असलेल्या पीडीपीचे डझनभर नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखाली शेर-ए-काश्मीर पार्कजवळ पक्षाच्या मुख्यालयातून निषेध मोर्चा काढला.
भाजपने डौलात फडकावला तिरंगा
कलम 370 रद्द केल्यानंतर दोन वर्षे पूर्ण झाल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी रॅली काढून तिरंगा फडकवला. अनंतनाग जिल्ह्यातील खानाबाल येथील भाजपच्या रमेशिया रफीक यांनी काश्मीर खोऱ्यात पक्षाच्या उत्सवाची सुरुवात खानाबलमधील डिग्री कॉलेजजवळ राष्ट्रध्वज फडकवून केली. त्यांच्यासोबत सुमारे 200 कार्यकर्ते होते.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग म्हणाले की, 2019च्या या निर्णयाची आणखी एक महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणजे विभाजनवादी आणि दहशतवादी शक्तींना हा मोठा धक्का आहे.
5 ऑगस्टचा सुवर्णदिन
5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्राने जम्मू -काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला आणि पूर्वीचे राज्य दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले. दोन वर्षांपूर्वी केंद्राच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मुफ्ती आणि पीडीपी जोरदार आवाज उठवत आहेत.
लाल चौकात निरव शांतता
श्रीनगरच्या लाल चौक सिटी सेंटरसह अनेक भागात दुकाने बंद होती, परंतु दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आणि बडगाम, गंदरबल आणि कुपवाडा भागात कलम 370 रद्द केल्याला दोन वर्षे पूर्ण झाल्यावर श्रीनगरमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरातील अनेक भागात सार्वजनिक वाहतूक बंद होती.
आज ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने’बद्दल जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले, “5 ऑगस्टची आजची तारीख खूप खास झाली आहे. ही तीच तारीख आहे, जेव्हा दोन वर्षांपूर्वी देशाने एक भारत, श्रेष्ठ भारत या भावनेला आणखी बळ दिले होते. 5 ऑगस्टलाच कलम 370 हटवून जम्मू -काश्मीरमधील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक हक्क, प्रत्येक सुविधेचा पूर्ण भागीदार बनवले होते.”
2nd Anniversary Of Article 370 revoke bjp hoists tricolor across jammu kashmir so pdp says day of mourning
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानातील मंदिर तोडफोडप्रकरणी भारत सरकारची कठोर भूमिका, परराष्ट्र मंत्रालयाने पाक उच्चायुक्ताला बोलावले
- Ravi Dahiya Wins Silver : हरियाणा सरकारकडून रवी दहियाला 4 कोटी रुपयांच बक्षीस, गावात बांधणार इनडोअर स्टेडियम
- Tokyo Olympics 2020 : पहिलवान रवी दहियाने घडवला चमत्कार, देशाला मिळवून दिले रौप्य पदक, पंतप्रधान मोदींनी केले कौतुक
- Pegasus Spyware Case : सर्वोच्च न्यायालयाच्या लेखी पेगासस प्रकरण गंभीर, याचिकाकर्त्यांना त्यांच्या याचिकेची प्रत केंद्राला पाठवण्यास सांगितले
- पाकिस्तानात धर्मांधांचा पुन्हा उच्छाद : धर्मांधांनी गणपती मंदिराची केली तोडफोड, मूर्तीही केली ध्वस्त; व्हिडिओ व्हायरल होऊनही स्थानिक सरकारचे मौन