• Download App
    नव्या संसद भवनात सेंगोल अर्थात राजदंडाची पुनर्प्रतिष्ठापना हा तर नेहरू - सावरकर - मोदी संगम!! 28 may 2023 : Sengol - Sceptre to be placed in new parliament is "Sangam" of Nehru - Savarkar - Modi

    नव्या संसद भवनात सेंगोल अर्थात राजदंडाची पुनर्प्रतिष्ठापना हा तर नेहरू – सावरकर – मोदी संगम!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 28 मे 2023 सावरकर जयंती दिली नव्या संसद भवनाचे उद्घाटन करत आहेत. याच दिवशी ते पंडित नेहरूंनी 14 ऑगस्ट 1947 रोजी चोल साम्राज्याच्या स्वीकारलेल्या सेंगोलची अर्थात राजदंडाची नव्या संसद भवनात प्रतिष्ठापना करणार आहेत. हा खऱ्या अर्थाने प्रकारे नेहरू – सावरकर – मोदी संगम आहे. 28 may 2023 : Sengol – Sceptre to be placed in new parliament is “Sangam” of Nehru – Savarkar – Modi

    तसेही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या संगम साठी देशभरातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच तर ते एकाच वेळी तमिळ – काशी, तमिळ – सोमनाथ संगम आयोजित करतात, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ते उत्तर – दक्षिण सहकार्य (North – South Cooperation) आणि दक्षिण – दक्षिण सहकार्य (South – South Cooperation) यांचे प्रमुख नेते बनतात. ते भारत – अमेरिका – ऑस्ट्रेलिया – जपान या चतुष्कोणाचे अर्थात QUAD चेही नेते बनतात. या प्रत्येक गोष्टीचे राजकीय, सामाजिक आणि जागतिक राजनैतिक संदर्भ जरी वेगवेगळ्या असले तरी त्यामागे सर्वात महत्त्वाचा धागा जो जोडण्याचा आहे, तो “संगम” पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरत आहेत.

    – सावरकरांच्या टीकाकारांना प्रत्युत्तर

    नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर काँग्रेस सह सर्व विरोधक जरी बहिष्कार घालत असले तरी मोदी मात्र उघडपणे पंडित नेहरूंचे नाव घेत सावरकर जयंतीच्या दिवशी स्वतः नेहरूंनी स्वीकारलेल्या चोल साम्राज्याच्या सेंगोलची प्रतिष्ठापना करणार आहेत. हा एक अनोखा योगायोग त्यांनी साधला आहे. देशात ज्यावेळी सावरकरांच्या देशहितैशी हिंदुत्वाला टोकाचा विरोध करण्याची प्रवृत्ती मुजोर होत आहे, त्याला पंतप्रधान मोदींनी आपल्या राजनैतिक कृतीतून सकारात्मक आणि खणखणीत उत्तर देण्याचा हा प्रयत्न केला आहे.

    नेहरुंचा वारसा – सावरकरांची जयंती

    मोदी हे नेहरुंचा वारसा नाकारतात. ते नेहरूंचा इतिहास पुसायला निघाले आहेत, असा त्यांच्यावर वारंवार आरोप होतो. तो आरोप यानिमित्ताने पुसण्याचा तर त्यांचा प्रयत्न आहेच, पण तो प्रयत्न देखील एक विशिष्ट उच्च परंपरा आणि दर्जा राखून त्यांनी केला आहे. किंबहुना उच्चतम भारतीय परंपरेचे पुनरुज्जीवन ते देखील जे नेहरूंनी स्वतः केले होते, त्याची पुनर्स्थापना मोदी करत आहेत. आणि त्यासाठी त्यांनी सूचकपणे सावरकर जयंतीचा दिवस निवडला आहे, हे यातले वेगळेपण आहे!!

    नेहरूंचा वारसा काँग्रेस नाकारतेय

    पण नेमके त्याच वेळी त्याच दिवशी काँग्रेस नेते मात्र संसदेच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार घालून आपल्याच पंडित नेहरूंच्या देदिप्यमान वारसाला नाकारत आहेत. वास्तविक बाकीच्या विरोधी पक्षांचा नेहरूंच्या त्या वारसाशी काहीही संबंध नाही पण तरी देखील नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार घालून बाकीचे विरोधी पक्ष काँग्रेसची फरफट करीत आहेत आणि काँग्रेस त्यांच्या मागे वाहावत जात आहे. अन्यथा काँग्रेसने केवळ आणि केवळ मोदी विरोधाच्या नावाखाली नेहरूंनी स्वीकारलेल्या सेंगोलच्या प्रतिष्ठापनेला विरोध करण्याचे काहीच कारण नव्हते.

    विचारसरणी पलीकडे सर्वसमावेशकता

    पण त्या पलीकडे जाऊनही मोदी स्वतःची प्रतिमा सर्वसमावेशी प्रतिमा ठसविण्याचा प्रयत्न करत आहेत. किंबहुना आपण संकुचित विचार न करता सर्व विचारसरणींना एकत्र घेऊन देशाच्या एकतेसाठी व्यापक भूमिका घेऊ शकतो, हे मोदी दाखवून देत आहेत. काँग्रेसने नेहरूंची प्रतिमा फक्त धर्मनिरपेक्ष नेता अशी केली. त्याचवेळी त्यांचा “पंडित” नेहरू म्हणून असलेला भारतीयत्वाचा वारसा दडविला. काँग्रेसने नेहरूंचा जो वारसा दडविण्याचा प्रयत्न केला, तो वारसा आपण पुढे घेऊन जात आहोत किंबहुना त्याची नव्या संसद भवनात पुनर्प्रतिष्ठापना करत आहोत हे मोदी अधिक ठळकपणे दाखवून देत आहेत. त्या सकारात्मक अर्थाने नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सेंगोलची प्रतिष्ठापना पुनर्प्रतिष्ठापना हा नेहरू – सावरकर – मोदी असा संगम आहे!!

    28 may 2023 : Sengol – Sceptre to be placed in new parliament is “Sangam” of Nehru – Savarkar – Modi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक