वृत्तसंस्था
नागपूर : महाराष्ट्र पोलिसांच्या c60 पथकाने मोठा पराक्रम गाजवून 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यामध्ये भीमा कोरेगाव दंगलीचा आरोपी आणि नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश आहे. नक्षलवाद्यांशी परवा सकाळी झालेल्या चकमकीचा थरार या c60 या तुकडीचे प्रमुख पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितला.26 naxals were killed in an encounter with the C-60 unit of Maharashtra Police in the jungles of Gyarapatti in Gadchiroli district yesterday
अंकित गोयल म्हणाले, की नक्षलवाद्यांच्या कॅम्पची टिप आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आमच्या तुकड्या ग्यारापट्टी जंगलात पुढे सरसावल्या होत्या. बरोबर सकाळी 6.00 वाजता चकमकीला सुरुवात झाली. नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक हत्यारे होती त्यात एके 47, एसएलआर, युएलजीबी यांच्यासारख्या रायफली होत्या.
Naxal Attack in Gaya : गयामध्ये नक्षलवाद्यांनी 4 जणांना दिली फाशी, बॉम्बस्फोट करून उडवले घर
त्यातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. सुमारे 9.00 तास ही चकमक चालली होती. पोलिसांची कुमक कार्यक्षमतेने आणि कौशल्याने लढली. आपल्या चार पोलिसांना नक्षलवाद्यांच्या गोळ्या लागल्याने ते जखमी झाले त्यांना वेळीच एअरलिफ्ट करून नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच वेळी चकमक देखील सुरू होती नऊ तासांच्या चकमकीनंतर 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले. यामध्ये 20 पुरुष आणि 6 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
आता 26 नक्षलवाद्यांची ओळख पटली असून त्यामध्ये मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश आहे. त्याचबरोबर नक्षलवाद्यांच्या वेगवेगळ्या तुकड्यांचे कमांडर्सही आहेत. त्यांची सर्व अत्याधुनिक हत्यारे जप्त करण्यात आली असून त्यांचा दारुगोळ्याचा साठाही तेवढाच मोठा होता, तो शोधून जप्त करण्याचे काम अजून सुरू आहे. पोलीस पथकाचे कोम्बिंग ऑपरेशन अजून थांबलेले नाही. नक्षलवाद्यांचे यांचे मूळ खणून काढेपर्यंत ही मोहीम सुरू राहील, अशी ग्वाही देखील अंकित गोयल यांनी दिली आहे.
26 naxals were killed in an encounter with the C-60 unit of Maharashtra Police in the jungles of Gyarapatti in Gadchiroli district yesterday
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी