• Download App
    शेतकरी आंदोलनातही पोहोचला कोरोना, आंदोलनातील 25 वर्षीय महिलेचे निधन । 25-year-old woman from Farmers Protest At Tikari Border Died due to corona

    शेतकरी आंदोलनातही पोहोचला कोरोना, टिकरी बॉर्डरच्या आंदोलनातील २५ वर्षीय महिलेचे निधन

    Farmers Protest : दिल्लीच्या टिकरी बॉर्डरवर मागच्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. कोरोना महामारीचा विळखा येथेही पडल्याचे समोर आले आहे. शेतकरी आंदेलनात सहभागी असलेल्या 25 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून शेकडो शेतकर्‍यांसह ती या चळवळीचा भाग होती. महिलेच्या निधनानंतर आंदोलक शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. 25-year-old woman from Farmers Protest At Tikari Border Died due to corona


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीच्या टिकरी बॉर्डरवर मागच्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. कोरोना महामारीचा विळखा येथेही पडल्याचे समोर आले आहे. शेतकरी आंदेलनात सहभागी असलेल्या 25 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून शेकडो शेतकर्‍यांसह ती या चळवळीचा भाग होती. महिलेच्या निधनानंतर आंदोलक शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

    हरियाणा सरकारच्या म्हणण्यानुसार, पश्चिम बंगालची रहिवासी मोमिता या महिलेचे कोरोनामुळे निधन झाले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाविरोधात प्रचार करणार्‍या शेतकऱ्यांसमवेत मोमिताही होत्या. त्या अनेक महिन्यांपासून हरियाणा-दिल्ली सीमेवर आंदोलन करत होत्या.

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, 26 एप्रिलपासून मोमिताला कोरोनाची लक्षणे दिसू लागली. हरियाणा पोलिसांतील अधिकाऱ्याने सांगितले की, ’26 एप्रिलला मोमिता नावाच्या महिलेला ताप आला. यानंतर त्यांना बहादूरगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांना बेड मिळू शकला नाही.’ यानंतर मोमिताला रोहतकमधील पीजीआयएमएस येथे नेण्यात आले, पण तेथेही त्यांना एकही जागा मिळाली नाही. त्यानंतर त्यांना बहादूरगडच्या शिवम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु तोपर्यंत त्यांच्यामध्ये कोरोनाचा संसर्ग तीव्र झाला होता. गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

    केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन नवीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ मुख्यत्वे पंजाब आणि हरियातील शेतकरी दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूरच्या बॉर्डरवर आंदोलन करत आहेत. हे तिन्ही कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी आंदोलक शेतकर्‍यांची आहे. कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. हे तिन्ही कायदे मागे घेण्याबरोबरच किमान आधारभूत किमतीबाबतही कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आतापर्यंत केंद्र सरकार आणि शेतकरी आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या आहेत. तथापि, अद्यापही गुंता सुटलेला नाही.

    25-year-old woman from Farmers Protest At Tikari Border Died due to corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार