• Download App
    उत्तर प्रदेशात विषारी दारू घेतल्याने २४ जणांचा बळी, कोरोना काळात भेसळयुक्त दारूचा व्यवसाय तेजीत।24 died in hooch tragedy in UP

    उत्तर प्रदेशात विषारी दारू घेतल्याने २४ जणांचा बळी, कोरोना काळात भेसळयुक्त दारूचा व्यवसाय तेजीत

    वृत्तसंस्था

    लखनौ : उत्तर प्रदेशात विषारी दारू घेतल्याने गेल्या दोन दिवसात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण आजारी पडले असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 24 died in hooch tragedy in UP

    कोरोनाच्या काळात उत्तर प्रदेशात भेसळयुक्त आणि विषारी दारूचा व्यवसाय तेजीत आहे. आंबेडकरनगर, बदायूं, आझमगड येथे दारूविक्रेते निर्धास्तपणे व्यवसाय करत आहेत. त्यामुळे आझमगडच्या मित्तूपूर बाजारात काही दिवसांपूर्वी विषारी दारू पिल्यानंतर २५ हून अधिक नागरिक आजारी पडले. त्यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे कालपर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे आंबेडकरनगर येथे देखील विषारी दारू पिल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे.



    जिल्ह्यातील जैतपूर, कटक, मालीपूर येथे अनेकांनी भेसळयुक्त दारुचे प्राशन केले होते. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि चौकशी सुरू झाली. या प्रकरणी अबकारी विभागाने निरीक्षकासह चौघांना निलंबित केले आहे. तसेच त्यांची खात्यामार्फत चौकशी सुरू झाली आहे. विषारी दारूमुळे घडलेल्या घटनांची माहिती पोलिसांकडून गोळा केली जात आहे.
    जैतपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मखदूमपुर गावात विषारी दारूचा प्रकार घडला आणि तेथे एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी ग्रामस्थांच्या मते, लग्नसमारंभात आणि गावात त्याच ठिकाणची दारू लोकांनी घेतली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांना यापूर्वी कोणताही आजार नव्हता.

    24 died in hooch tragedy in UP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Tani community : तानी समुदायाच्या लोकांची मागणी, तानीलँडची निर्मिती करा; पोलिसांनी युनायटेड तानी आर्मीची टोळी पकडली

    Mumbai soldier : पाकविरोधात लढताना मुंबईचा जवान शहीद; मुरली नाईक यांना उरीमध्ये लढताना वीरमरण

    Neeraj Chopra : आयपीएल नंतर आता ‘ही’ क्रीडा स्पर्धा देखील भारतात झाली स्थगित