• Download App
    नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 22 जवान शहीद, शोध मोहीम सुरूच; 700 जवानांना घेरून केला होता हल्ला । 22 jawans martyred in Naxal attack in Bijapur Chhattisgarh, search operation continues

    नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २२ जवान शहीद, शोध मोहीम सुरूच; ७०० जवानांना घेरून केला होता हल्ला

    22 jawans martyred in Naxal attack : नक्षलग्रस्त विजापूर आणि छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर 22 जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शनिवारी बस्तर भागात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर काही सैनिक बेपत्ता होते, पण शोधमोहिमेदरम्यान चकमकीच्या ठिकाणी आणखी मृतदेह सापडले. यानंतर एकूण 22 जवान शहीद झाल्याची माहिती बिजनौरच्या एसपींनी दिली. दुसरीकडे, 30 जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 22 jawans martyred in Naxal attack in Bijapur Chhattisgarh, search operation continues


    वृत्तसंस्था

    विजापूर : नक्षलग्रस्त विजापूर आणि छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर 22 जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शनिवारी बस्तर भागात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर काही सैनिक बेपत्ता होते, पण शोधमोहिमेदरम्यान चकमकीच्या ठिकाणी आणखी मृतदेह सापडले. यानंतर एकूण 22 जवान शहीद झाल्याची माहिती बिजनौरच्या एसपींनी दिली. दुसरीकडे, 30 जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    वृत्तसंस्था एएनआयनुसार छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवर नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर 21 जवान बेपत्ता होते. त्यांचा शोध सुरू होता. पोलिस दलाने सांगितले होते की, सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून महिला नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला. चकमकीत नक्षलवाद्यांचेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

    शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास बस्तर परिसरातील जोनागुडा गावाजवळ नक्षलवाद्यांची पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मी (पीएलजीए) बटालियन आणि तारिमच्या सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. ही चकमक तीन तासांहून अधिक काळ चालली. यात कोब्रा बटालियनचा एक जवान, बस्तरिया बटालियनचे दोन जवान आणि डीआरजीचे दोन जवान (एकूण पाच जवान) ठार झाल्याचे पाल यांनी सांगितले होते. यावेळी 30 जवान जखमी झाले आहेत. जखमींपैकी सात जवानांना रायपूरच्या रुग्णालयात आणि 23 जवानांना विजापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलवादी हल्ल्यात शहीद जवानांबद्दल शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदी म्हणाले की, सैनिकांचे बलिदान कधीही विसरणार नाही. ट्वीटमध्ये पीएम मोदींनी लिहिले की, “छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांबद्दल माझ्या संवेदना आहेत.” शूर हुतात्म्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना.”

    गृहमंत्री शहा यांनी व्यथा व्यक्त केली

    गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट केले की, मी छत्तीसगडमध्ये माओवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या आमच्या वीर सुरक्षा दलाच्या जवानांच्या बलिदानाला नमन करतो. देश त्यांचे शौर्य कधीही विसरणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना. शांती आणि प्रगतीच्या या शत्रूंविरुद्ध आमचा लढा सुरूच राहील. जखमी लवकर बरे होण्याची कामना करतो.”

    22 jawans martyred in Naxal attack in Bijapur Chhattisgarh, search operation continues

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य