विशेष प्रतिनिधी
अलिगड : उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये विषारी दारूच्या सेवनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आज २२ वर पोचली असून अन्य २८ जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो.22 died in UP Hooch tragedy
या मद्यसेवनामुळे शुक्रवारी रात्री सातजण मरण पावले होते. अन्य गंभीर आजारी असलेल्या २८ रुग्णांवर येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, अलिगड मुस्लिम विद्यापीठ आणि मल्खानसिंह जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शेजारील खेड्यांमधून देखील आणखी काही नागरिक आजारी पडल्याच्या बातम्या येत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. लोढा, खैर आणि जावान या तीन खेड्यांमधील १५ लोकांचा शुक्रवारी मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला वेग दिला असून आतापर्यंत विषारी दारूच्या विक्रीमध्ये सहभागी असलेल्या पाचजणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य सूत्रधार अनिल चौधरी याचाही समावेश आहे.
याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत बाराजणांविरोधात गुन्हे दाखल केले असून जिल्हाभरात अनेक ठिकाणांवर छापेही घालण्यात आले.
22 died in UP Hooch tragedy
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेचा तब्बल सहा हजार अब्ज डॉलरचा अर्थसंकल्प, धनाढ्यांवर करवाढीचे संकट
- कोरोना काळात कैद्यांची गर्दी होणार कमी, राज्यात कारागृहांमधील ५४२ कैद्यांना तात्काळ पॅरोल
- राणीच्या बागेत आता गुंजणार चित्ता तसेच पांढऱ्या सिंहांची डरकाळी
- स्वच्छ भारत मिशन ! ‘ग्रँड वॉटर सेव्हिंग चॅलेंज’- केंद्र सरकार देत आहे ५ लाख रुपये जिंकण्याची संधी ; २५ जून पूर्वी करा अर्ज
- सोशल मीडियाच्या स्वयंघोषित फॅक्ट चेकर्सवर रविशंकर प्रसादांचा तिखट प्रहार; मोदी व्देषाच्या कारस्थानाची पोलखोल